या लेखा मध्ये आपण "भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना" काय आहे ते सविस्तर पाहणार आहोत.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना:
लाभार्थी पात्रता निकष :-
• वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
• शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे.
• जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे.
• जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक आहे.
• परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
क्षेत्र मर्यादा :
योजनेचा लाभ कोकण विभागासाठी 0.10 हे. ते कमाल 10 हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी किमान 0.20 हे ते कमाल 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे.
अनुदान मर्यादा :-
लाभार्थीस 100 टक्के अनुदान देय आहे. अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत प्रथम वर्ष 50 टक्के दुसरे वर्ष 30 टक्के तिसरे वर्ष 20 टक्के
लागवड कालावधी :-
जून ते मार्च अखेर
अर्ज कुठे करावा : -
संबंधित तालुका कृषि अधिकारी
समाविष्ट फळपिके :-
योजनेअंतर्गत आंबा, काजु, पेरु, चिक्कू, डाळींब,सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजिर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा, मोसंबी या 16 बहूवार्षिक फळपीकांची आवश्यकतेनुसार कलमे /रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता आहे.
फळपिकनिहाय अनुदान:
0 Comments