एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन सदर योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ - ST's 'Smart Card' scheme extended till March 31, 2021

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलतयोजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने, तसेच त्यासंबंधीची माहितीआगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला ३१मार्च,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येतअसल्याची माहिती मंत्री, परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरु असतील त्याभागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यातआली आहे.

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ:

Post a Comment

0 Comments