वृत्त विशेष

कृषि विभागामार्फत दिले जाणारे विविध कृषि पुरस्कार

या लेखा मध्ये आपण “कृषि विभागामार्फत दिले जाणारे विविध कृषि पुरस्कार (राज्य पुरस्कृत योजना)” काय आहे ते सविस्तर पाहणार आहोत. राज्यात दरवर्षी शेती व सलग्नं क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकर्‍यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जातात.

कृषि विभागामार्फत दिले जाणारे विविध कृषि पुरस्कार:

1. डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- (संख्या-१)

पुरस्कार सुरु वर्ष – सन- २०००-२००१

कृषी क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिकतंत्रज्ञानाचा वापरइत्यादी मध्ये अति उल्लेखनियकार्यकरणा-या राज्यातील कोणत्याही एका शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुप – रु.७५०००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – १९

2. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- (संख्या -१०)

पुरस्कार सुरु वर्ष- सन-१९८४-

कृषि विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञांचातसेच कृषि, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामिणविकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुप – रु.५००००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक

सत्कारसन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – २६४

3.जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- (संख्या ५)

पुरस्कार सुरु सन -१९९५

राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब, तसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्याकार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केली आहे.

पुरस्कार स्वरुप – रु.५००००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – १०२

4. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार- (संख्या-९)

पुरस्कार सुरु सन -२००९-१०

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतुने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुप – रु.५००००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – ५५

5. उद्यान पंडित पुरस्कार- (संख्या-८)

पुरस्कार सुरु सन – २००१-०२

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठयाप्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.पुरस्कार स्वरुप – रु.२५,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – १९८

6. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- (संख्या ३)

पुरस्कार सुरु सन -१९९४

जे जाणते शेतकरीत्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेतीकरीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील) वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा-या महिला, कृषि विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुप – रु.३००००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – ७२

7. वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार- (संख्या-२५)

पुरस्कार सुरु सन -१९६७

शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादी मधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, इत्यादींची लागवड करणे, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड, शेतक-यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुपरु.११०००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – १३९६

8.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,कृषि सेवारत्न पुरस्कार- (संख्या-२)

पुरस्कार सुरु सन -२०१४

राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यां मधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्यशासनाव्दारे सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार स्वरुप – पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – ०६

9.राज्यस्तरीय पिकस्पर्धा विजेते शेतकरी

पुरस्कार सुरु सन -१९५९-६०

पीकस्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धक शेतकऱ्याकडे लागवडीखाली आणावयाचे कमीत कमी क्षेत्र सर्व पिकासाठी १० आर.

जिल्हा पातळीवरील पीकस्पर्धेत भाग घेउन १ ते ५ क्रमांक मिळविल्यास राज्यस्तरीय पीकस्पर्धांमध्ये भाग घेता येतो.

पीकस्पर्धा जाहीर करण्यासाठीकमीतकमी स्पर्धक संख्या –

१) सर्वसाधारण गट-१० २) आदिवासी गट- ५

पुरस्कार स्वरुप –

प्रथम क्रमांक- रु.१००००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

द्वितीय क्रमांक- रु.७०००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

तृतीय क्रमांक- रु.५०००/- रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

सन २०१६ अखेर देण्यात आलेले एकूण पुरस्कार – ३००

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.