आता सातबारा उतारा हवा असेल तर आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण आता राज्यातील २३ बँकाबरोबर भूमी अभिलेख विभागाने करार केला आहे. या बँकांना डिजिटल सही असलेला ऑनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जासाठी किंवा बँकेच्या इतर कारणासाठी सातबारा जोडण्याची गरज नाही. महसुल विभागाने राज्यातील सर्व जमीनीचे सातबारा संगणकीकृत करून दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील २ कोटी ५३ लाख सातबारांपैकी २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारा डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत. त्यामुळे त्यांची प्रत ऑनलाईन उपलब्ध होत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in बॅंकिंग पोर्टल उघडले आहे. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी २३ बँकांनी करार केले आहेत अशी माहिती राज्याचे ई-फेरफार समनव्यक रामदास जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे आता अनेक जणांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. या करारामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, आय.सी.आय.ई.आय. बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक इ. बँकांचा समावेश आहे.
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन डाउनलोड करा:
Download the 7/12 Transcripts of the Digital Signature Online Now:
- खालील वेबसाईट लिंक ओपन करा.
- या वेबसाईट वर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता नोंदणी करा. (New User Registration)
- वैयक्तिक माहिती - Personal Information
- पत्ता माहिती - Address Information
- लॉगइन माहिती - Login Information
यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
- जिल्हा (District):
- तालुका (Taluka):
- गाव (Village):
- सर्वे नंबर /गट नंबर शोधा (Search Survey No./Gat No.):
- सर्वे नंबर /गट नंबर निवडा (Select Survey No./Gat No.):
0 Comments