या लेखा मध्ये आपण "फलोत्पादन यांत्रिकीकरण योजना" काय आहे ते सविस्तर पाहणार आहोत.
योजनेची प्रमुख उद्ष्टिे :-
- शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.
- शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.
- फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.
- फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.
- घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी
लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी. संकेत स्थळावर नोंदणी करतांना शेतकऱ्यांनी सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-1), 7/12 उतारा, फोटो, आधार सलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स प्रत (फोटोसहीत), आधार कार्ड, जातीचा दाखला (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी) इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
फलोत्पादन यांत्रिकीकरण योजना (सरकारी योजना):
आवश्यक कागदपत्रे
1. अर्ज.
2. 7/12 चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह).
3. आधार कार्डाची झेरॉक्स (नसल्यास आधार कार्डाची मागणी केलेल्या पावतीची झेरॉक्स).
4. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (फोटोसह).
5. हमीपत्र.
6. लाभार्थी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असल्यास वैध अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/संवर्ग दाखला.
वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी यांना 10 कार्यालयीन दिवसात सादर करावयाचा आहे. अपूर्ण व त्रुटीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
पुर्वसंमती –
1. तालुका कृषि अधिकारी यांनी पात्र प्रस्तावांना लक्षांकाच्या अधिन राहुन पुर्वसंमती द्यावी.
2. ट्रॅक्टर या घटकाची मोका तपासणी तालुका कृषि अधिकारी यांनी करावी. तर मंडळ कृषि अधिकारी यांनी अवजारे या घटकाची मोका तपासणी करावी.
3. तालुका कृषि अधिकारी यांनी प्रस्ताव हॉर्टनेटद्वारे जिल्हा कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा. सदर प्रस्तावास उपविभागीय कृषि अधिकारी यांनी अनुदानाची शिफारस करावी.
4. जिल्हास्तरावरुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी लाभार्थ्यींच्या खात्यात पी.एफ.एम.एस. द्वारे अनुदान जमा करावे..
हेही वाचा - बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (१००% टक्के राज्य पुरस्कृत)
तपासणी टक्केवारी :-
अमंलबजावणी सुचनामधील क्षेत्रविस्तार या घटकांची तालुका कृषि अधिकारी यांनी 15 टक्के किंवा 60 यंत्र/अवजारे, उपविभागीय कृषि अधिकारी यांनी 10 टक्के किंवा 50 यंत्र/ अवजारे,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी 5 टक्के किंवा 25 यंत्र/ अवजारे व विभागीय कृषि सहसंचालक यांनी 2 टक्के किंवा 10 यंत्र/ अवजारे याप्रमाणे तपासणी करावी.
अंमलबजावणी करीता महत्वाच्या सुचना :-
1. जिल्हास्तरावर या योजनेसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे अंमलबजावणी अधिकारी म्हणून काम पहातील. उपरोक्त यादीतील प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांनी पुर्वसंमती द्यावी. पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थींने यंत्रसामुग्री, औजारे व उपकरणे खरेदी करावीत.
2. फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक एका विशिष्ट उद्देशाने राबविण्यात येत असल्यामुळे योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आवश्यक आहे. निवड केलेल्या लाभार्थ्याकडून घटक योग्य रितीने राबविण्याबाबतचे हमीपत्र घ्यावे.
3. लाभार्थ्यीने फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत कृषि अवजारे, सयंत्रे व उपकरणे ही कृषि आयुक्तालयाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार व केंद्र शासनाच्या यांत्रिकीकरण योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खरेदी करावीत. .
4. अनुदान दिल्यानंतर लाभार्थ्याने ट्रॅक्टर/ अवजारावर योजनेचे नाव, वर्ष, लाभार्थ्यीचे नाव नमुद करावे.
5. मंडळ कृषि अधिकारी यांचे मोका तपासणी अहवालानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेस्तरावरुन पी.एफ.एम.एस. द्वारे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
हेही वाचा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (१००% टक्के राज्य पुरस्कृत)
या लेखात आपण फलोत्पादन यांत्रिकीकरण योजना काय आहे ते पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!
0 Comments