तुमची नोकरी गेली आहे का? मिळवा तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार - अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना

केंद्र सरकारने कोरोनाचे संकट थोपवून लावण्याच्या हेतूने 23 मार्चपासून देशभर लॉकडाउन केला. या कोरोना काळात अनेकांना कामावरून घरी बसावे लागले. 23 मार्च ते 31 डिसेंबर या काळात नोकरी गेलेल्या संघटित उद्योगातील कामगारांसाठी राज्य कामगार विमा आयुक्‍तालयातर्फे अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेअंतर्गत पगारातील 50 टक्‍के रक्‍कम (तीन महिन्यांपर्यंत) दिली जात आहे. राज्यभरातून या योजनेअंतर्गत तब्बल 11 हजारांहून अधिक नोकरदारांनी अर्ज केले आहेत. 

जॉब गेलेल्या नोंदणीकृत कंपनीमधील कामगारांना राज्य कामगार विमा योजनेद्वारे आधार देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. त्यात ऍटोमोबाईल, आयटीसह अन्य उद्योगांमधील कामगारांचा समावेश आहे. राज्य कामगार विमा आयुक्‍तालयाच्या पुणे, नाशिक, मरोळ, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या सहा विभागाअंतर्गत अनेक  कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक कामगारांना तीन कोटींपर्यंत रक्‍कम वितरीत करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारकडून कामगारांना मिळणाऱ्या योजनांसाठी उद्योगांमधील कामगारांची संख्या किमान 20 पर्यंत असणे बंधनकारक होते. मात्र, लॉकडाउननंतर अनेकांचा रोजगार गेल्याने राज्य सरकारच्या पुढाकारातून कामगारांची उद्योगांमधील मर्यादा आता दहा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता असे कामगारही विविध योजनांसाठी पात्र ठरणार आहेत. 

तुमची नोकरी गेली आहे का? मिळवा तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार - अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना

अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना:

योजनेसंदर्भातील ठळक बाबी:

  1. 23 मार्च ते 31 डिसेंबर या काळात कोरोनामुळे जॉब गमावलेले कामगार योजनेसाठी पात्र 
  2. लाभासाठी संबंधित कामगार त्या कंपनीत दोन वर्षांपर्यंत काम करत असावा; आता तो कामावर नसावा 
  3. कामावरून कमी करण्यापूर्वीच्या सहा महिन्यांत संबंधित कामगाराने 78 दिवस काम केलेले असायला हवे 
  4. कामावरून कमी करण्यापूर्वीचे सहा महिने वगळता उर्वरित दीड वर्षात त्याने 78 दिवस काम केलेले असावे 
  5. कोरोनामुळे जॉब गमावलेल्यांना अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 मार्चपर्यंत मुदत
अटल बीमित व्यक्ति कल्याण योजनेसाठी ऑफलाईन नोंदणी:

अटल बिमित कल्याण योजनेचा फायदा घेण्यासाठी या योजनेमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्गी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म योग्य पद्धतीने भरून राज्य विमा निगमच्या कुठल्याही जवळच्या शाखेत जमा करावा लागेल.

अटल बीमित व्यक्ति कल्याण योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी:

ESIC च्या पोर्टलवर एम्प्लॉईज नंबर टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अटल बिमित म्हणून पर्याय आहे, त्यावर क्‍लिक करून बॅंक डिटेल्ससह अन्य माहिती भरून तो अर्ज सबमिट करावा. त्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थींना तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार काही दिवसांतच त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जातो. ESIC पोर्टल लॉगिन मदतीसाठी हिथे क्लिक करा.  

https://www.esic.in/

हेही वाचा - पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments