तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) मध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे ३ हप्ते मिळतात. या PM-Kisan योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी करणं आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा PM-Kisanच्या वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.

हेही वाचा - पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या.

 

तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा - Check Your PM Kisan Yojana Installment has been Deposited in the Bank


तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा:

त्यासाठी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करायचं आहे.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर Get Data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

सरकारनं जारी केलेले आता पर्यंत PM-Kisanचे सर्व हप्ते तुम्हाला पाहायला मिळतील. 

सरकारकडून या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्‍याला 2 हजार रुपयांच्या तीन हफ्त्यात 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जरूरी आहे.

हेही वाचा - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2020 यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा

या लेखात आपण पीएम किसान योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते पहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments