आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण या लेखामध्ये रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते व जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची याची माहिती पाहणार आहोत. तसे बगायला गेलं तर आज जवळपास सगळ्याच लोकांकडे रेशनकार्ड आहेत. त्यातील बरेच जण रेशन घेतात. पण आपल्याला किती रेशन मिळते? किंवा किती रेशन मिळायला हवे? याचा विचार कोण करत नाही दुकानदाराने आपल्याला रेशन दिले की ते आपण घरी घेऊन येतो. दुकानदार जे काही सांगेल तसे आपण करत असतो. पण हे चुकीचे आहे कारण आपल्याला माहित असायला पाहिजे कि तुम्हाला किती धान्य मिळायला हवे. हे आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो. आपल्याला डाळ, गहू, रॉकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत की नाही हे आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतो.

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती


रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे?

सर्वप्रथम अन्न पुरवठा विभागाच्या http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर भेट द्या. 

त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन सेवा (Online Seva) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

पुढे ऑनलाईन रास्तभाव दुकाने हा पर्याय वरती क्लिक करा .

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या !!

पुढे AePDS-सर्व जिल्हे हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या !!

त्यानंतर वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर डाव्या बाजूला RC Details हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या !!

आता हिथे पहिल्यांदा ज्या महिन्याचे धान्य चेक करायचे आहे तो महिना (Month) निवडा आणि वर्ष (Year) निवडा आणि पुढे आपला १२ अंकी रेशनकार्डवर असलेला SRC No नंबर टाकायचा आहे. आणि मग पुढे Submit बटन वर क्लिक करा. 

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या !!
Submit बटन वर क्लिक केल्यावर आपले सदस्य तपशील दिसेल, त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीची नावे दिसतील, तिथेच दुसऱ्या खालील रकान्यामध्ये मध्ये आपल्या कुटुंबाला किती धान्य मिळणार आहे त्याची माहिती दिली जाते.

आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घ्या !!

सरकारने जेवढे आपल्याला धान्य मंजूर केलेले असते ते वेबसाईटवर दाखवले जाते. त्यापैकी आपल्याला किती मिळते हे आपण चेक करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला आपले धान्य बरोबर मिळते का नाही याची चौकशी करू शकतो.

हेही वाचा - रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

रेशन दुकानावरील तक्रारी:

आता माहिती अधिकाराच्याद्वारे आपण आपल्या दुकानातील कारभार सुरळीत चालू आहे का? याची माहिती मिळवू शकतो. कारण रेशननिंग व्यवस्थेवर खूप गरिबांचे पोट चालू आहे. खूप वेळ दुकानदारांच्या तक्रारी येत असतात की, महिन्याचे जे रेशन आहे ते फक्त ८ दिवस वाटले जाणार किंवा आठवड्यातून फक्त २ वेळ रेशन दिले जाणार. यावेळी धान्य कमी आले आहे त्यामुळे तुम्हाला पण कमी दिले जाईल. अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात. जर कामकाज नीट चालत नसेल तर आपण माहितीच्या अधिकाराद्वारे कारभार कसा चालतो याची माहिती मिळवू शकतो.

ही माहिती केंद्रीय माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येते. याच्या अर्जामध्ये ३ प्रकार पडतात. पहिला म्हणजे जनमाहिती अधिकार, दुसरा अपिली अधिकारी यांना द्यायचा अर्ज, तिसरा म्हणजे अर्ज थेट आयुक्तांना द्यायचा. त्यांना अ, ब, क असे गट पाडण्यात आले आहेत.

हा अर्ज आपण साध्या कागदावरसुद्धा करू शकतो. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव टाकायचे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकायचा. माहीतिचा विषय टाकायचा. खाली लिहायचे की, आपल्या कार्यालय अंतर्गत असलेल्या दुकान नंबर (जो असेल तो) स्वस्त धान्य दुकानांमध्ये आला आहे.

तसेच अन्नधान्य व तेल रॉकेलचा या व पुढील महिन्यातील समायोजित झालेला कोटा इत्यादी नोंदी असलेल्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी.व विक्री पावती बुकची सत्यप्रत द्यावी. आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या घाऊल रॉकेल दुकानदारांची संख्या किती? आता माहिती कोणत्या प्रकारे हवी आहे ते लिहावे.

अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही ते लिहावे. १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प पेपर जोडा. अर्जदाराची सही, ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर लिहा. असा अर्ज करून जमा करा.

रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in वर तक्रार करा. 

हेही वाचा - माहिती अधिकाराचा (RTI) अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा जाणून घ्या सविस्तर. 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments