महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी किती मिळतो? आणि मिळालेल्या निधीपैकी किती निधी ग्रामपंचायत गावासाठी खर्च करते? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं?याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

गावाचे बजेट कसं ठरतं:

ग्रामविकास समिती प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. या समितीमध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानुसार या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती निधी उपलब्ध आहे, तसेच सरकारकडून किती निधीची अपेक्षा आहे, याचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं.

” गावातल्या सगळ्या योजनांचं एकत्रित अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणं आवश्यक असतं. हे अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.

“एका गावाकरता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा जवळपास 1140 योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं.”

जर योजना राज्य सरकारची असेल तर 100 टक्के निधी राज्य सरकार देतं आणि केंद्राच्या बहुतांश योजनांसाठी 60 टक्के केंद्र सरकार,तर 40 टक्के राज्य सरकार देतं. 1 एप्रिल 2020 पासून 15 वा वित्त आयोग सुरू झाला आहे. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार 957 रुपये देत आहे. 14 व्या वित्त आयोगासाठी ही रक्कम 488 रुपये होती.

14 व्या वित्त आयोगानं जो पैसा गावासाठी दिला होता, त्यातला 25 टक्के मानवविकास, 25 टक्के कौशल्य विकास, 25 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25 टक्के पायाभूत विकासासाठी खर्च करण्यास सरकारने सांगितलं होतं.

आता 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 50 टक्के निधी पाणीपुरवठा, स्वछता आदी बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे, तर उर्वरित 50 टक्के इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे.

‘ई-ग्राम स्वराज’ एक मोबाईल एप्लिकेशन:

ई-ग्राम स्वराज’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या पंचायती राज दिवसाला म्हणजेच 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई-ग्राम स्वराज’ या मोबाईल एप्लिकेशनचं लोकार्पण केलं.या अँपद्वारे ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल. यामध्ये ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कोणत्या कामासाठी खर्च झाला, ही सगळी माहिती ‘ई-ग्राम स्वराज’ या अँपद्वारे उपलब्ध होईल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय काम सुरू आहे, ते कुठवर आलं आहे, हि सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकतो. ”

ते म्हणाले, “या ऍपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती उपलब्ध असेल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय सुरू आहे, काय काम सुरू आहे, ते कुठवर आलं आहे, सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकतो.”

ग्रामपंचायतीने किती पैसा खर्च केला कसे पाहायचे?

ग्रामपंचायतीनं गावाच्या विकास कामासाठी किती खर्च केला हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज” नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे.

https://play.google.com/store/apps/eGramSwaraj

स्थानिक संस्था निवडा:

हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.

Select Local Body
Select Local Body

नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.या पेजवर सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते, ती तुम्हाला दिसेल. यात राज्य,जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल.

त्यानंतर तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्षं निवडायचं आहे.

eGramSwaraj
eGramSwaraj

त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय दिसतील यामधील सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details हा. ER Details म्हणजेच Elected Representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती यात दिसून येते. यात संबंधितांचं नाव,पद, वय, जन्मतारिख अशी माहिती दिलेली असते.

मंजूर उपक्रम (Approved Activities):

त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved Activities हा. यात ग्रामपंचायतीला गावातील कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असतं.

Approved Activities
Approved Activities

आर्थिक प्रगती (Financial Progress):

तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress यामध्ये गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.

या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरुवातीला तिथं दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असतं.

Financial Progress
Financial Progress

त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम Receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम Expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.

त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.

ग्रामपंचायतीला दिलेला निधी उरला तर त्या निधीचे ग्रामपंचायत काय करते:

ग्रामपंचायतीला दिलेला निधी जर उरला तर तो निधी सरकारला परत जातो. पण जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम आहे असे समजले जाते. कारण गावाच्या विकासासाठी आलेला निधी त्या गावच्या सरपंचाने गावच्या विकासासाठी वापरलेला नसतो किंवा गावचा विकास आराखडा तयार केलेला नसतो. तसेच गावातील लोकांच्या कोणत्या समस्या आहेत यांकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालेलं असते.

हेही वाचा – एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • ग्रामपंचायत मध्ये अभंग निधीचा प्रकार असतो का?

    महिलां करिता बजेट मधील निधी चा कसा वापर करता येईल?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.