जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

बऱ्याच वेळेला आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे त्याचे मापन करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.

शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

मोजणीसाठी लागणारे अर्ज आणि कागदपत्रे:

शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाली तर शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात अर्ज करू शकतात. या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मोजणी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत:

तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.

अर्जदाराची माहिती :

पहिल्या पर्यायापुढे "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.

मोजणीचा कालावधी:

दुसरा पर्याय म्हणजे "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील"हा आहे. यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर "मोजणीचा कालावधी" आणि "उद्देश" लिहायचा आहे. पुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक येथे टाकायचा आहे.

मोजणीसाठी लागणारे शुल्क:

"सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम." हा तिसरा पर्याया समोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक व तारीख लिहायची आहे.

हेही वाचा - जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?ते जाणून घ्या. 

मोजणीसाठी लागणारा कालावधी:

मोजणीसाठी जी फी आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते. जमीन मोजणीचे तीन प्रकार पडतात. यामध्ये साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये पूर्ण केली जाते, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाते.

जमिनीच्या मोजणीवरून आकारण्यात येणारे शुल्क: 

एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क किंवा फी आकारली जात असते. मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.

उद्देश:

"उद्देश" या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे यामध्ये शेतजमिनीची हद्द किती आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा उद्देश शेतकरी लिहू शकतात.

जमिनीच्या सहधारकांची माहिती:

चौथ्या पर्यायामध्ये "सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक" म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असल्यास त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.

हेही वाचा - १८८० पासूनचे जुने जमिनीचे फेरफार डायरी उतारा ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

लगतचे शेतकरी:

पाचव्या पर्यायामध्ये "लगतचे शेतकरी यांची नावे आणि पत्ता" लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहणं गरजेचं आहे.

अर्जासोबतच्या कागदपत्रांचं वर्णन:

शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात. जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते. ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

हेही वाचा - आता डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन डाउनलोड करा.

कागदपत्रांची तपासणी:

हा अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.

मोजणी अर्जाची पोहोच:

मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. व शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

या लेखात आपण जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? ते पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

2 Comments

  1. Bhau Kay sangu mojni application receive karyche pan paise magtat he lok....Tal:Akole Dist Ahmednagar

    ReplyDelete
  2. सर मला माझ्या शेताची मोजणी करायची आहे, परंतु इतर गटातील शेतकरी जर मोजणीसाठी परवानगी देत नसतील तर यावर काय उपाय आहे.

    ReplyDelete