या लेखामध्ये आपण "विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे?" याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. लग्नानंतर आपल्याला अनेक कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतात.त्यामध्ये आपले आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉइंट खात उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज भासते.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे ? जाणून घ्या सविस्तर:
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
हेही वाचा - ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती
हेही वाचा - घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे?
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला "ग्राम विकास व पंचायत राज" हा पर्याय निवडायचा आहे.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये दारिद्र्यरेषेखालील नोंदणी, एपीएल दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
नंतर ग्रामविकास विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये "विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे,
हेही वाचा - जाणून घ्या ऑनलाईन मतदान कार्ड कसे बनवायचे?
अर्जदाराची माहिती:
नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा,तालुका,व गावाचे नाव टाकायचे आहे.
त्यापुढील रकान्यामध्ये वराचे संपूर्ण नाव,विवाह दिनांक आणि विवाहचे ठिकाण टाकायचे आहे.
पुढे तुम्हाला वराचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
तसेच वधूचे नाव व वधुचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. (वधूचे नाव टाकताना सासरचे नाव व शाळेच्या दाखल्यावर जे नाव असेल ते नाव टाकायचे आहे.)
यानंतर समावेश करा या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक-202842132495600059036.कृपया दस्ताऐवज अपलोड करा आणि सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा.
1 Comments
विवाह नोंदणी ऑनलाईन शहरी भागात सुद्धा करता येते का याबाबत माहिती सांगा प्लिज
ReplyDelete