पॅनकार्ड व आधार कार्ड हे सर्वांसाठी खूप महत्वाचे दस्तऐवज आहेत.अनेक सरकारी कामांसाठी पॅनकार्ड व आधार कार्ड हे लागतेच. पण आता सरकारच्या नवीन नियमानुसार पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे व हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. तसेच मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल व असे जर नाही केले तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
आयकर विभागाच्या मते 31 मार्च 2021 नंतर जर तुम्ही निष्क्रिय पॅनकार्ड वापरत असाल, तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड भोगावा लागेल. तसेच 31 मार्च २०२१ पर्यंत कार्डधारकांनी जर पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक नाही केलं तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया:
1) पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी सर्व प्रथम खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
2) त्यानंतर आपले पॅनकार्ड नंबर,आधार नंबर, व नाव टाकून कॅप्चा कोड व्यवस्थित भरा
3) त्यानंतर लिंक आधार‘या पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुमचे आधार पॅनकार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
टीपः
- पॅन नुसार नाव, जन्म तारीख आणि लिंग आपल्या आधार तपशीलांच्या आधारे मान्य केले जाईल.
- कृपया खात्री करुन घ्या की “आधार क्रमांक” आणि “आधार नुसार नाव” तुमच्या आधार कार्डावर छापल्यासारखेच आहे.
आधार कार्ड -पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते कसे पाहायचे ?
1)आधार कार्ड-पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते पाहण्यासाठी खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
2) त्यानंतर आधार आणि पॅनकार्ड नंबर टाका
४) त्यानंतर 'View Link Aadhaar Status’वर क्लिक करा.
आता तुम्हाला पॅनकार्ड आधार कार्डला लिंक झाले किंवा नाही ते दिसेल. हिथे खालील स्नॅपशॉट मध्ये आधारकार्ड लिंक झाले आहे असा मॅसेज दिसत आहे.
0 Comments