जर आपण प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2020-21 मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे. आपल्या घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
या लेखा मध्ये आपण ही यादी कशी पाहायची, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण काय आहे. याचीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत पाहणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण):
भारत सरकारनं 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सुरू केली होती आणि 2022 पर्यंत देशातल्या सगळ्यांना 2 कोटी 95 लाख घरं उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत 25 स्क्वेअर मीटरचं घर बांधता येतं. तसेच घर बांधण्यासाठी महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात 1 लाख 20 हजार, तर हिमाचलसारख्या पर्वतीय राज्यांमध्ये 1 लाख 30 हजार रुपये मदत दिली जाते. ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
मैदानी राज्यांसाठी 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देतं, तर पूर्वेकडील राज्यात 90 टक्के निधी केंद्र तर 10 टक्के निधी राज्य सरकार देतं.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:
घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण विभागाची वेबसाईट ओपन करा.
यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल. आता वरच्या बाजूला असलेल्या Awaassoft या पर्यायावर जाऊन यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे Report यावर क्लिक करा.
- पुढे MIS Reportचे एक वेब पेज ओपन होईल यापेजवर Selection Filters या पर्यायाखालील स्थानिक लोकेशनुसार पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
- त्यामध्ये सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झालं की मग तुम्हाला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.
- आता आपल्याला 2020-21 या वर्षातील लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे त्यामुळे आपण 2020-21 हे वर्ष निवडलं आहे.
- त्यानंतर कोणत्या विविध योजनेचे पर्याय दिसतील त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) योजनेची यादी पाहण्यासाठी "Pradhan Mantri Awas Yojana Gramin" हा पर्याय निवडू.
- तसेच नंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.
- शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल.
हेही वाचा - ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ज़िल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन
1 Comments
Kahich yaadi yet nahi
ReplyDelete