आपण या लेखामध्ये कृषी योजनांची सगळी माहिती महाराष्ट्र शासनाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून कशी मिळवायची याची माहिती पाहणार आहोत, यामध्ये आता बघायला गेलं तर राज्यामध्ये अनेक कृषीविषयक योजना राबविण्यात येत आहेत व आतापर्यंत अनेक कृषीविषयक योजना राबविल्या हि गेल्या आहेत. आता सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आता तर व्हॉट्सअॅप आणि ब्लॉग यांच्या साहाय्याने शेतकरी नवनवीन माहिती मिळवू शकतात. अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक आहेत.या सर्व बाबी लक्षात घेऊन कृषी विस्तार कार्यामध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे WhatsApp वर तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा देण्यात आली आहे.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला विविध योजनांची आणि सुविधांची माहिती घरबसल्या मिळावी आणि त्याचा लाभ घेता यावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे WhatsApp आहे.
तुम्हाला फक्त ८०१०५५०८७० या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप (WhatsApp) वरून नमस्कार किंवा हॅलो (Hello) हा मेसेज पाठवायचा आहे.
मग त्या व्यक्तीला स्वागत संदेश मिळतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत की वर्ड दिले गेले आहेत.
ते जर तुम्ही टाईप करून मेसेज केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळते. सध्या या उपक्रमामध्ये कृषी विभागाच्या २७ योजनांचा लाभ शेतकऱ्याला घेता येऊ शकतो. त्यात जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचादेखील समावेश आहे. जी माहिती हवी आहे त्याविषयी एकदम संक्षिप्त माहिती तुम्हाला सहज भेटून जाईल
हेही वाचा - मोफत शेतकरी मासिक, कृषि विभाग महाराष्ट्र राज्य
या लेखात आपण कृषी योजनांची माहिती व्हॉट्सअॅप नंबरवरून कशी मिळवायची ते सविस्तर पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!
1 Comments
Good information
ReplyDelete