पोकराचे अनुदान होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा निधी मंजुर (PoCRA )

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूणा नदीच्या खो-यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पध्दती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत  निवडलेल्या गावांमध्ये टप्याटप्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या प्रकल्पांतर्गत  निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सन 2020-21 मध्ये एकूण रु.35197 लाख निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

पोकराचे अनुदान होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा निधी मंजुर (PoCRA )

प्रकल्पास चालू वर्षी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीतून प्रथम प्रलंबित दायित्व अदा करण्याकरिता आणि प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीकरीता निधी वितरणाबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 3 च्या पत्रांन्वये प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषर्ष संजीवनी प्रकल्प यांचे कडून प्राप्त झाला आहे. सबब, प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी रु.10937.50 लाख एवढा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

(PoCRA ) शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे:-

 

हेही वाचा - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (PoCRA) योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments