पोस्ट ऑफिस आणि पेमेंट बँकची सर्व्हिस आता एकाच अ‍ॅपवर, डाक-पे (DakPay)अ‍ॅप्लिकेशन झालं लाँच

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टपाल विभाग यांनी मंगळवारी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाक-पे’ (DakPay) लाँच केलं. आता तुम्ही या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही एकाच अ‍ॅपवर वापरु शकणार आहात. DakPay एक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह पेमेंट अ‍ॅप्लिकेशन आहे जो आपल्याला आपला मोबाइल फोन वापरुन पेमेंट करण्यासाठी भीम यूपीआय वापरण्याची परवानगी देतो. DakPayचा वापर करून, तुम्ही यूपीआय बरोबर इन्स्टंट मनी ट्रान्सफर करू शकता आणि ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये इन्स्टंट पेमेंट देखील करू शकता. आपल्या बँक खात्यावर DakPayवर दुवा साधा आणि त्वरित बीएचआयएम यूपीआय सह पैसे हस्तांतरित करा. DakPayअ‍ॅप सुरक्षित आणि सुरक्षित आहे, आपल्या सर्व देयके आणि बँकिंग गरजा पूर्ण करते आणि इंटरनेट बँकिंगपेक्षा बरेच चांगले आहे.

पोस्ट ऑफिस आणि पेमेंट बँकची सर्व्हिस आता एकाच अ‍ॅपवर, डाक-पे (DakPay)अ‍ॅप्लिकेशन झालं लाँच


DakPayचा असा करा वापर- (DakPay UPI by IPPB):

गुगल प्ले-स्टोअरवरुन हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.fss.ippbpsp

डाऊनलोड केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाईल बनवावी लागेल. तुम्ही एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करु शकतात. 

यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे 4 अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल.

'DakPay’ या अ‍ॅपमध्ये डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डॉमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात.

व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवू शकता. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल.

 DakPay अ‍ॅप एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील.

हेही वाचा - आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक तपासा

या लेखात आपण पोस्ट ऑफिस आणि पेमेंट बँकची सर्व्हिस आता एकाच डाक-पे (DakPay)अ‍ॅप्लिकेशनवर कसे मिळणार ते सविस्तर पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !

Post a Comment

0 Comments