प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजना (PMKUVA)

राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील ११ क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत.

१. बांधकाम (Construction)

२. उत्पादन व निर्माण (Manufacturing Production)

३. वस्त्रोद्योग (Textile)

४. ऑटोमोटिव्ह (Automobile)

५. आतिथ्य (Hospitality)

६. आरोग्य देखभाल (Healthcare)

७. बँकिंग, वित्त व विमा (Banking, Finance Insurance)

८. संघटित किरकोळ विक्री (Organized retail)

९. औषधोत्पादन व रसायने (Pharmaceutical Chemicals)

१०. माहिती तंत्रज्ञान व संलग्न (IT and ITes)

११. कृषी प्रक्रिया (Agro Processing)

वरील ११ प्राधान्यांची क्षेत्रे, तसेच इतर हि अन्य महत्त्वाची क्षेत्रे, उदा. कृषी, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी अशा अन्य अनेक क्षेत्रांमध्ये राज्यातील उमेदवारांना प्रशिक्षित करून त्यांचे सक्षमीकरण करणे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजना (PMKUVA)

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA):

प्रवर्ग नाव : सदरील योजना सर्व प्रवर्गांसाठी लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी : 

  1. 15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य शिकण्यासाठी मराकौवि सोसायटीकडे संबंधीत प्रशिक्षण पुरविणाऱ्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते. 
  2. प्रशिक्षण घेण्यासाठी MSSDS च्या संकेत स्थळावर प्रशिक्षण संस्थांची यादी असून, अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती आहे.

आवश्यक कागदपत्रे : 

आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणा करीता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्याचे सर्व प्रमाणपत्रे.

लाभाचे स्वरूप असे : 

प्रत्येक लाभार्थ्यास दिल्या जाणा-या प्रशिक्षणावर होणारा खर्च राज्य शासनामार्फत केला जातो.

या ठिकाणी संपर्क साधावा : 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 4 मजला, एम.टी.एन.एल. बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005.

अर्ज करण्याची पद्धत : 

इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या संकेतस्थळावरून, पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणार्‍या संस्थांच्या यादीमधून संबंधित संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे.

संकेतस्थळ : https://kaushalya.mahaswayam.gov.in/

प्रक्रियेला लागणारा वेळ : 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे (MSSDS) सूचिबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे अर्ज केल्यावर त्या संस्थेकडून सदर प्रशिक्षण सुरू करण्यात येणार्‍या पुढील तुकडीत समावेश करण्यात येईल


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments