आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती, इथे करा नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज

आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असून ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. आयडीबीआय बँकेच्या एकूण १३४ रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड डी), असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड सी), मॅनेजर (ग्रेड बी), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती, इथे करा नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज


आयडीबीआय बँकेतभरती संदर्भातील महत्वाच्या तारखा:

आयडीबीआय बँकेच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - २४ डिसेंबर २०२० व अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०२१ 

पदांची माहिती

डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड डी) - ११ पदे

असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड सी) - ५२ पदे

मॅनेजर (ग्रेड बी) - ६२ पदे

असिस्टंट मॅनेजर (ग्रॅड - ए) - ९ पदे

एकूण पदे - १३४

निवड प्रक्रिया:

आलेल्या अर्जांमधून उमेदवारांना आधी शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ग्रुप डिस्कशन / वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आयडीबीआयच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्जांची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून होत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जानेवारी २०२० आहे.

IDBI Bank SCO Notification 2020 साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.idbibank.in/pdf/careers/DetailedAdvertisementSpecialists2020-21.pdf

Apply करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.asp

हेही वाचा - स्टेट बँक ऑफ इंडियातील या पदांसाठीच्या जागा रिक्त, इथे करा ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments