आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर - १५ जानेवारी २०२१

महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, आता तर प्रत्येक गाव -गावांमध्ये राजकीय वातावरणाला सुरुवात होणार आहे कारण राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.यामध्ये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.व त्याचे मतदान  15 जानेवारीला होणार आहे.

आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर - १५ जानेवारी २०२१ - The entire program of Gram Panchayat election of your village - 15th January 2020


आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम - १५ जानेवारी २०२१:

निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा:

१) निवडणुकीची नोटीस:

निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020 च्या आदेशानुसार एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे.या नुसार जिल्हाधिकारी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.तसेच 7 डिसेंबर 2020 पर्यंत त्यावर हरकती घेण्यात येतील तसेच 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तसेच निवडणुकीची नोटीस १५ डिसेंबर ला तहसीलदार प्रसिद्ध करतील. 

२) नामनिर्देशन करण्याचा कालावधी:

तसेच या निवडणुकांसाठी ची नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील.तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत:

तसेच उमेदवारी अर्जाची छाननी ही 31 डिसेंबर 2020 रोजी होईल.व नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व उमेदवारांची अंतिम यादी 4 जानेवारीला जाहीर होईल. तसेच 4 जानेवारीलाच निवडणूक चिन्ह वाटप होईल.

४) प्रत्यक्ष मतदान तारीख:

तसेच प्रत्यक्ष मतदान हे 15 जानेवारी 2021 ला असेल व त्याची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. तसेच गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

५) मतमोजणी:

मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल.व त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

६) 25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार:

यामध्ये निवडणूक आयोगातर्फे असे ठरवण्यात आले आहे कि विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

८) निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234

निवडणुकीबाबतचे आदेश:

१) दिलेल्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूका घेण्यात याव्या. 

२) मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत पार पाडण्याची जबाबदारी संभंधित जिल्हाधिकारी यांची आहे. 

३) ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका चालू आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत आचारसंहिता लागू राहील. तसेच मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषनामंत्री,खासदार ,आमदार व संबंधित स्थानिक स्वराज संस्थेतील पदाधिकाऱ्यांना   आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही.

४) तसेच निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालींदवारे राबविण्यात येईल. व या निर्देशनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

५) तसेच फक्त गडचिरोली जिल्ह्यातच मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.व इतर सर्व जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल.

६) निवडणूक प्रक्रिया नीट पारदर्शी पद्धतीने पाडण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

७) निवडणूका पार पाडत असताना कोविड १९ चा अनुषंगाने जी खबरदारी घेण्यात यावी त्याची राज्य निवडणूक आयोगाकडून स्वत्रंत्रपणे सूचना जरी करण्यात येतील त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

या लेखात आपण ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रमाची माहिती पाहिली. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.


आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments