दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to Get BPL Certificate Online?

विविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to Get BPL Certificate Online?


दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती:

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी  “आपले सरकारची

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/  हि वेबसाईट ओपन करायची आहे. 

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल, नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

हेही वाचा -  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा. 

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला "ग्रामविकास व पंचायत राज विभाग" हा पर्याय निवडायचा आहे. 

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील "दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला" या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to get BPL certificate online?


त्यानंतर "महाऑनलाईन"  हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये "दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला-अर्जदाराची माहिती:

हिथे अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका,ग्रामपंचायतीचे नाव,अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), आधार क्रमांक, दारिद्र्य रेषेखाली दाखला किती वर्षाचा पाहिजे तो कालावधी टाकायचा आहे,(उदा.2014-2015), यादी क्रमांक (यादी क्रमांक या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे यादी क्रमांक मागायचा आहे. Parent Name (पालकांचे नाव ) हि सर्व माहिती टाकायची आहे, व "समावेश करा" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to get BPL certificate online?

समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल "तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला" आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.

नंतर "ओके" या पर्यायावर क्लिक करा.  हा दाखला तुम्हाला ५ दिवसामध्ये भेटतो.

हेही वाचा - उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर जाणून घ्या

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments