भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत निवडणूक ओळखपत्र दिले जाते. अनेक सरकारी कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. हे ओळखपत्र मिळवण्यासाठी आपल्याला आता कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ते मिळवू शकता.
ऑनलाईन मतदान कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या सविस्तर:
ऑनलाईन प्रक्रिया:
राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाइट सुरु केली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी nvsp.in या वेबसाइट वर जायचे आहे.
Login and Register यावरती क्लिक करायचे आहे.
नंतर तुमचा User Name and Password टाकायचा आहे. व Captcha Code भरायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर Don't have Account Register as a New User यावरती क्लिक करायचे आहे. व आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे.
Login वरती क्लिक करायचे आहे.
Login वरती क्लिक केल्यावर Fresh Inclusion /Enrollment वर क्लिक करा.
त्यानंतर Citizenship मध्ये जाऊन I Reside in India वर क्लिक करा. व आपले राज्य निवडून Next बटण वरती क्लिक करा.
पहिल्यांदा Assembly Constituency (विधानसभा मतदार संघ) निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच राज्य, जिल्हा, घर नंबर , तालुक्याचे नाव ,पोस्ट ऑफिस ,पिन कोड व आपण ज्या गावाचे नाव टाकले आहे त्या गावात आपण कधीपासून राहत आहेत ती तारीख व आपली जन्मतारीख टाकायची आहे.
आवश्यक कागदपत्रे:
तुम्हाला Upload Document हा Option येईल,त्यामध्ये Address Proof Upload करायचा आहे . Address Proof मध्ये आपल्याला खालील पैकी एक Documents अपलोड करायचा आहे,त्यामध्ये
- बँक/किसान/पोस्ट ऑफीस करंट पास बुक
- रेशन कार्ड
- इनकम टॅक्स पावती
- रेंट अग्रीमेंट
- पाण्याचे बिल
- टेलिफोन बिल
- इलेक्ट्रिसिटी बिल
- गॅस बिल
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- Driving लाइन्सन्स
स्वतःची माहिती:
त्यानंतर तुम्हाला स्वतःची माहिती टाकायची आहे.
- आधारकार्ड प्रमाणे स्वतःचे नाव
- आडनाव
- जेंडर (लिंग)
- वडिलांचे नाव
- स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे.
- त्यानंतर नेक्स्ट बटण वरती क्लीक करा.
- Visual impairment -दृष्टीदोष
- Speech & Hearing disability-भाषण आणि सुनावणीचे अक्षमता
- Locomotor disability-लोकोमोटर अपंगत्व
- Other-इतर
0 Comments