वृत्त विशेष

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक

या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना काय आहेत ते सविस्तर पाहणार आहोत.

योजनेचा लाभ घेणेसाठी तसेच पात्रतेसाठी महत्वाच्या बाबी:

शेतक-याच्या नावे मालकी हक्काचा 8 अ आणि 7/12 असावा.

सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद 7/12 उता-यावर असावी. नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र द्यावे. इतर साधनांद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधीत विभागाच्या अधिका-याचे प्रमाणपत्र शेतक-यांनी सादर करावे.

सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधीतांचे करारपत्र द्यावे.

विद्युतपंपाकरीता कायम स्वरुपी विद्युत जोडणी असावी. त्यापृष्ठ्यर्थ मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत सादर करावी.

सोलरपंपाची व्यवस्था असल्यास सोलार पंप बसवुन घेतल्याबाबतचे पत्र व सोलार पंपाबाबतची कागदपत्रे शेतक-यांनी प्रस्तावाबाबत द्यावे.

शेतक-यांकडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

एखादा लाभधारक योजनेत सहभागी होणेस पात्र आहे. मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही अशा लाभधारकांना आधार क्र. प्राप्त होईपर्यंत आधार नोंदणी पावती/मतदार ओळखपत्र/ रेशनकार्ड/ पासपोर्ट / पॅनकार्ड /किसान फोटोकार्ड/ मनरेगा कार्ड /बॅंक पोस्ट आफीस पासबुक /शासकीय कर्मचारी असल्यास ओळखपत्र यापैकी पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक:

योजनेचा लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे:

अ. नोंदणीकरीता –आधारकार्ड

ब. अनुदान प्रस्तावाकरीता –
शेतक-याने केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत
पुर्वसंमती पत्र
7/12 उतारा (मालकी हक्कासाठी)
8-अ उतारा ( एकुण क्षेत्राच्या माहितीसाठी)
आधारकार्ड सत्यप्रत
आधारलिंक्ड राष्ट्रीयकृत बॅंक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत
कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र आणि भौगोलिक
स्थानांकन पद्धतीने लाभार्थी नोंदणी संदर्भातील शेतकरी/शेतकरी प्रतिनिधी समवेत संचाचे अंक्षांश/रेखांशसह फोटोची प्रत
बिलाची मुळ प्रत (टॅक्स ईन्वहाॅईस)
शेतक-याचे हमीपत्र
अनुदान देय: अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी यांना 55 टक्के आणि इतर शेतकरी यांना 45 टक्के अनुदान.

पात्र शेतक-यास किती क्षेत्र मर्यादेत लाभ मिळु शकतो?

पात्र शेतक-यास 5 हे. क्षेत्राच्या मार्यादेत लाभ मिळतो. मात्र सन 2014-15 पर्यंत योजनेचा लाभ घेतलेल्या शेतक-यांना त्याच क्षेत्रावर लाभ घेतल्याच्या तारखेपासुन 10 वर्षाच्या कालावधीसाठी व सन 2015-16 पासुन लाभ घेतलेल्या शेतक-यांना त्याच क्षेत्रावर लाभ घेतल्याच्या तारखेपासुन 7 वर्षाच्या कालावधीसाठी अनुदान अनुज्ञेय असणार नाही.

योजनेचा लाभ घेणेसाठी प्रक्रीया:

सर्वप्रथम http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php या वेबसाईटचे मुख्य पानावरील “ शेतकरी” या भागावर क्लिक करुन लाभार्थी नोंदणी यामध्ये लाभार्थ्यांनी स्वत:चे आधारकार्ड द्वारे नोंदणी करावी. त्यानंतर वेबसाईटचे मुख्य पानावरील “ शेतकरी” या भागामध्ये दिलेले वर्ष निवडावे आणि आधार नंबर हा लाग ईन आय डी आणि पासवर्ड टाकुन अर्ज भरुन सादर करावा.

नोंदणी करतांना मुख्यत्वे कोणती माहिती भरणे आवश्यक आहे?
स्वत:चे नांव व पत्ता (बॅंक पासबुक व आधारकार्ड वर दर्शविलेप्रमाणे)
आधारकार्ड अपलोड करणे व क्रमांक नोंदणे.
बॅंक खाते क्र. व बॅंक शाखा
मोबाईल क्रमांक- नोंदणी झालेनंतर लाभार्थी क्र संदेशाद्वारे मोबाईलवर उपलब्ध होतो.
लाभार्थ्यांना त्यांचे मोबाईलवरील संदेशाद्वारे अर्ज स्थितीबाबत माहिती उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रीया कशी आहे? त्यासाठी मुख्यत्वे कोणती माहीती भरावी लागणार?
ज्या ठिकाणी शेतजमीन आहे आणि त्याकरीता अर्ज करावायाचा आहे तो जिल्हा,तालुका, गाव
लाभ घेणेकरीता लागवड क्षेत्र, खाते उतारा क्रमांक,पीक,पिकातील अंतर,
बॅंक खाते क्र, शाखा, जिल्हा, बॅंकेचे नांव (राष्ट्रीयकृत बॅंक फक्त)
ज्या उत्पादक कंपनीकडुन संच खरेदी करणार आहे ती कंपनी
“ पुर्वसंमती शिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे” असे स्वयंघोषणापत्र वर बरोबर ची मार्क करुन अर्ज सादर करणे.
शासन निर्देशानुसार अंतिमत: अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
अर्ज सादर केलेनंतर मोबाईलवर संदेशाद्वारे अर्ज क्र. प्राप्त होतो. ज्याद्वारे अर्ज स्थिती पाहण्यास मदत होते.
लाभार्थी नोंदणी ते लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात अनुदान वर्ग होईपर्यंत विविध कार्यवाहीबाबत माहीती कोठे उपलब्ध होईल ?
लाभार्थी नोंदणी ते बॅंक खात्यात अनुदान वर्ग होईपर्यंत विविध स्थितीबाबत माहीती लाभधारकास मोबाईलवर एसएमएस द्वारे वेळोवेळी कळविणेत येतात.
तसेच वेबसाईटचे मुख्य पानावरील “शेतकरी” या भागाची निवड करुन त्यामध्ये अर्जाची स्थिती या बटणवर क्लिक करुन लाभार्थी क्रमांक आणि अर्ज क्र. टाकुन अर्ज स्थिती पाहता येईल.
भरलेले अर्ज यावर क्लिक करावे आणि भरलेले सर्व अर्जाची माहिती शेतक-यांना मिळेल.
लाभार्थी अर्ज सादर करणेपासुन ते अंतिम अनुदान अदायगीपर्यंत कार्यवाहीबाबत विविध टप्पे तसेच जबाबदार कार्यालये खालीलप्रमाणे?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक – Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana – More crop per drop

ठिबक सिंचन संच- प्रमुख अंतराकरीता मापदंड/ हेक्टर
1.2 x 0.6 मी (किंवा त्यापेक्षा कमी अंतर)- 112237 रु.
1.5 x1.5 मी.- 85603 रु.
5 x 5 मी. -34664 रु.
6 x 6 मी.- 30534 रु.
10 x 10 मी. -23047 रु.

तुषार सिंचन संच –चल स्प्रिंक्लर (पोर्टेबल)

75 मी मी .पाईपकरीता – 21901 रु./ हेक्टर
63 मी.मी. पाईपकरीता -19542 रु./हेक्टर

संच खरेदी कोठुन करावा?

कृषि विभागाकडील नोंदणीकृत कंपनी/वितरक यांचेकडुन

ई-ठिबक आज्ञावलीचे मुख्य पानावरील नोंदणीकृत वितरक/उत्पादक कंपनी यांची यादी प्रदर्शित केली असुन कंपनीनिहाय घटकांचे दर सुद्धा उपलब्ध आहेत.

विविध लागवड अंतरावरील क्षेत्राकरीता खर्च मर्यादा व अनुदान मर्यादा.

अ. ठिबक सिंचन –

केंद्र शासनाने सन 2017-18 मध्ये प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सुचनातील परिच्छेद -8 नुसार ठिबक सिंचन संच उभारणीच्या खर्च मर्यादा निश्चीत केलेल्या आहेत. त्यानुसार विविध लॅटरल अंतर व प्लॉट साईजनुसार ठिबक सिंचन संचाचे अनुदान परिगणना करणेसाठी खालील प्रमाणे खर्च मर्यादा राहील.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक – Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana

ब. तुषार सिंचन संच –

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार खालील प्रमाणे संच उभारणीच्या किंमती निर्धारीत केलेल्या आहेत.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.