बँकिंग आणि फायनान्सवृत्त विशेषसरकारी कामे

बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान !

आपण या लेखामध्ये बँकेतील कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून कोणती कागदपत्रे घेणे गरजेचे आहे ते पाहणार आहोत. गरीब असो वा श्रीमंत बँकेकडुन कर्ज घेणे हे आता बऱ्याच जणांना नित्याचे झालेले आहे,कर्ज कसे मिळवायचे हे सर्वानाच माहित असते,व त्याची परतफेड कशी करायची याची सुद्धा माहिती असते परंतु बँकेकडील कर्ज संपुर्ण परतफेड केल्यानंतर सुध्दा बँकेकडुन आपल्याला काही कागदपत्रे मिळणे गरजेचे असते,व ती कागदपत्रे बँकेने ग्राहकांना देणे गरजेचे असते,बँकेचे ग्राहक म्हणुन तो तुमचा अधिकारच आहे.

बँकेकडून आपण विविध कारणांसाठी कर्ज घेत असतो त्यामध्ये गाडी,घर ,किंवा व्ययक्तिक कारणासाठी कर्ज घेतो तसेच शेतकरी हे शेतीसाठी पीक कर्ज घेत असतो. बँकेचे सर्व नियम वापरून त्याची परतफेड सुद्धा करत असतो. पण परतफेड केल्यानंतर आपली आता मुक्तता झाली आहे असा बऱ्याच जणांना गैरसमज होतो.

“No Dues Certificate” ना देय प्रमाणपत्र”:

आपण जरी कर्जाच्या रकमेची परतफेड केली तरी आपली जबाबदारी संपली असे नाही,जेव्हा आपण कर्जाची परतफेड करतो तेव्हा बँकेकडून “No Dues Certificate” म्हणजेच “ना देय प्रमाणपत्र” घेणे खुप आवश्यक आहे.ना देय प्रमाणपत्र जर नाही घेतल्यास आपल्याला त्याच बँकेकडुन अथवा दुसऱ्या बँकेकडुन कर्ज घ्यावयाचे असल्यास अडचण निर्माण होऊ शकते.

कधीकधी आपल्याला तात्काळ कर्जाची आवश्यकता असते .अशा वेळेला परत मागच्या कर्जाचे “नो ड्युज प्रमाणपत्र” काढण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो ,हा वेळ खर्च होऊ नये यासाठी नो ड्युज प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे.या प्रमाणपत्राशिवाय कर्ज मिळत नाही.

ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) म्हणजे काय?

संपुर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर “No Dues Certificate” बँकेकडुन संबधीत ग्राहकाला दिले जाते, तसेच बँकेव्यतिरीक्त खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन जरी कर्ज घेतलेले असेल व त्या कर्जाची संपुर्ण परतफेड केली असेल तर अश्या नोंदणीकृत सावकाराकडुन सुध्दा “No Dues Certificate” घेणे खुप गरजेचे आहे.

“ना देय प्रमाणपत्र”मिळवण्यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करणे:

“यामध्ये आपण जर नियमाच्या अनुषंगाने कर्जांची पुर्ण परतफेड नगदी,हप्त्याने अथवा चेकने केल्यास बँक कर्जदाराला एक पत्र पाठवुन कर्ज घेतेवेळी ग्राहकाने सादर केलेली मुळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे बँकेकडुन घेवुन जाण्यास सुचवते,पण कधीकधी ग्राहकाला संपुर्ण कर्जाची रंक्कम परतफेड करूनही बँकेकडुन असले पत्र येत नाही त्यावेळेस ग्राहकाने स्वत: हुन बँकेशी संपर्क करून सादर केलेली मुळ प्रमाणपत्रे व “No Dues Certificate” मिळवण्यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करावा लागतो. जरी आपण खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन कर्ज घेतांना सादर केलेली कागदपत्रे परत मिळवीण्यासाठी व त्याच्याकडुन “No Dues Certificate” प्राप्त करण्यासाठी सुध्दा त्याच्याकडे लेखी अर्ज सादर करता येतो.

तारण कर्ज (Mortgage Loan):

तारण कर्ज या प्रकारामंध्ये कर्ज घेत्यावेळी ग्राहक आपली संपत्ती कर्जाच्या बदल्यात बँकेला अथवा खाजगी नोंदणीकृत सावकाराला लिहुन देतो व लिहुन दिलेल्या मालमंत्तेची मालकी कर्ज घेतल्यानंतर जरी कर्ज घेतलेल्या ग्राहकाची असली तरी कर्जाच्या अटी व शर्तीनुसार कर्ज परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ झाल्यास तारण असलेल्या मालमत्तेला जप्त करण्याचा अधिकार बँकेला किंवा सावकाराला असतो.अशी तारण ठेवुन घेतलेल्या कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बँकेचे “No Dues Certificate” असल्याशिवाय तारण मालमंत्ता विकता अथवा हस्तांतरीत करता येत नाही.

वाहन कर्ज (Vehicle Loan):

जर आपण वाहन कर्ज घेतलेले असल्यास संबंधित वाहनाचे RC Certificate म्हणजेच प्रादेशीक परिवहन कार्यालय (R.T.O.) कार्यालयातील वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र बँकेच्या नावे असते, वाहन कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बॅकेकडुन “No Dues Certificate” घेवुन ते R.T.O. कार्यालयात सादर करून ग्राहक ते वाहन आपल्या नावावर करून घेवु शकतो.

विमा पॉलिसी तारण कर्ज:

जर आपली कोणती विमा पॉलिसी असेल तर ती तारण ठेवुन सुध्दा बँकेकडुन कर्ज मिळते अश्या वेळी बँक संबधित ग्राहकाची विमा पॉलिसी Assign करून घेते व ग्राहकाने बँकेकडुन घेतलेल्या कर्जाची संपुर्ण परतफेड केल्यानंतर ती विमा पॉलिसी बँकेकडुन “No Dues Certificate” घेवुन संबंधित विमा कंपणीकडुन Re Assign करून घ्यायला हवी.

सिबिल स्कोअर (Cibil Score):

आपल्या संपुर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर संबंधित बँकेडुन ग्राहकाला Cibil Score तीस दिवसानंतर मिळवता येवु शकतो. Cibil Score ची आवश्यकता क्रेडिट कार्ड मिळविण्यापासुन ते इतर कर्ज मिळवीण्यासाठी आवश्यक असतो.

हेही वाचा – सोने तारण कर्ज घेण्याचे फायदे, कागदपत्रे, परतफेड करण्याची प्रक्रिया माहिती !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.