ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा

आपण या लेखात ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी खटले कसे दाखल होणार? प्र.क्र.253/ पंरा-३ परिपत्रक मध्ये काय आहे ते सविस्तर पाहूया. 

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा:

ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे. ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना राबविल्या जातात. अनेक योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे.

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे  हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने परिपत्रक (जीआर) काढला आहे. 

पहिली तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करा:

ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि इतर कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावा. 

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी त्यावर त्याची प्राथमिक चौकशी महिन्याभरात करतील, तसेच चौकशी अंती कर्मचारी दोषी आढळ्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार. 

दुसरी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करा:

संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने जर एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण  पूर्ण केली नाही किंवा चैकशी करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करावी. 

हेही वाचा - माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर

परिपत्रक:-


मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

7 Comments

 1. अतिशय सुंदर हा लेख सर्वांसाठी उपयुक्त

  ReplyDelete
 2. सुंदर माहिती असलेला लेख

  ReplyDelete
 3. आमची पेसा ग्रामपंचायत आहे
  पुरुष सरपंच थेट जनतेतून निवडून आलेला आहे
  3 वर्ष पूर्ण झाली आहेत
  17 सदस्य व 18 वा सरपंच
  अविश्वास ठराव आणायचा आहे कसा आणावा
  बहुमत किती लागेल?
  सरपंचाला मतदानाचा अधिकार आहे का?
  अविश्वास ठराव कसा पारित होईल मार्गदर्शन करावे

  ReplyDelete
 4. ग्रामपंचायत ला किती निधी येतो हे बघा अगोदर इतर सर्व विभाग ची विचारणा करा आणिगावात इतर विभाग किती पैसे येत हे बघा
  मग खऱ्या अर्थाने कळेल हे फक्त खालची जनता खालीच लढत बसली पाहिजे राज्य शासन व त्यांचे इतर विभाग सोडून विचारणा करा तुम्ही खालीच लढत बसा आम्हाला म्हणजे इतर विभान याना विचारू नका
  खर जर म्हटलं तर इतर विभाग व ग्रामपंचायत यांच्या निधीत फार मोठी तफावत आहे प्रत्येक वेळे सरपंच व इतर याना बदनाम केलं जातं हे योग्य नाही

  ReplyDelete
  Replies
  1. शासन निर्णय आहे तसा - बदनाम कशाला कोण करेल, जर खरच गैरव्यवहार असेल तर शासन निर्णया प्रमाणे गुन्हे दाखल झाला पाहिजे

   Delete