RTIमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा

आपण या लेखात ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी खटले कसे दाखल होणार? प्र.क्र.253/ पंरा-३ परिपत्रक मध्ये काय आहे ते सविस्तर पाहूया.

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा:

ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे. ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना राबविल्या जातात. अनेक योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे.

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने परिपत्रक (जीआर) काढला आहे.

पहिली तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करा:

ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि इतर कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावा.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी त्यावर त्याची प्राथमिक चौकशी महिन्याभरात करतील, तसेच चौकशी अंती कर्मचारी दोषी आढळ्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार.

दुसरी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करा:

संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने जर एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण पूर्ण केली नाही किंवा चैकशी करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करावी.

शासन परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.