महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता महाडिबीटी पोर्टल ३ डिसेंबर पासून सुरू झालेले आहे.
त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाकरिता दि. 15 जानेवारी तर नव्याने प्रवेशीतांकरीता दि. 31 जानेवारी या अंतिम मुदतीच्या आत महाडिबीटी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालयांनी पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर श्री.प्रसाद खैरनार यानी केलेले आहे.
महाडिबीटी संकेतस्थळावर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रोसेस:
शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती” हा पर्याय निवडावा.
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या पर्यायावर क्लिक केल्यानंतर "नवीन अर्जदार नोंदणी" या पर्यायावर क्लिक करा, जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर "अर्जदार लॉगिन" वर क्लिक करा. नवीन नोंदणी मध्ये अर्जदाराचे नाव, युजर नेम, पासवर्ड, ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक टाकून नोंदणी करा.
नोंदणी झाल्यावर "अर्जदार लॉगिन" वर क्लिक करा.- कृपया आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा.
- आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा.
- आपला संकेतशब्द प्रविष्ट करा.
- प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा.
- लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा.
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा.
- जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा.
0 Comments