लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

आपण या लेखामध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे याची माहिती पाहणार आहोत, जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाहन चालवायचे असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. जर आपल्याकडे गाडी आहे पण ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यांच्यासाठी एक नामी संधी चालुन आली आहे. कारण आपण आता घरबसल्या ऑनलाईन लर्निंग लायसन्स कसे काढायचे हे पाहणार आहोत.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या


लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया:

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला https://sarathi.parivahan.gov.in/ हि वेबसाइट ओपन करायची आहे 

नंतर RTO वेबसाइटचे पेज ओपन होईल. या पेजमध्ये आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

राज्य निवडल्यानंतर डाव्या बाजूला "Learner Licence" या पर्यायामध्ये "Application for new Learner Licence" हा पर्याय निवडायचा आहे. 

त्यानंतर पुढील ऑर्डरमध्ये शिकाऊ परवान्यासाठी अर्ज सादर करण्याचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत, ते पाहून "Continue" बटन वर क्लिक करा. 

 1. अर्ज तपशील एलएल भरा
 2. डॉक्युमेंट अपलोड करा
 3. फी भरणे
 4. पे स्टेटसची पडताळणी करा
 5. पावती प्रिंट करा
 6. एलएल स्लॉट बुक

आपण मुत्सद्दी (परदेशी) / प्रवासी / शरणार्थी / परदेशी (परंतु मुत्सद्दी नाही) / माजी सैनिक / शारीरिकदृष्ट्या आव्हानित असाल तर कृपया श्रेणी (Category ) निवडा

यानंतर (Applicant does not hold Driving/ Learner Licence)  म्हणजेच आपल्याकडे अजुनपर्यत कोणत्याही प्रकारचे Licence नाहीये,जर नसेल तर त्या ऑपशन वरती क्लिक करायचे आहे.व SUBMIT या बटणावरती क्लिक करायचे आहे.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म :

यानंतर तुमच्या समोर लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये प्रथम स्वतःची माहिती, आरटीओ ऑफिस पासून ते तुमचे नाव, ब्लड ग्रुप, तुमच्या घराचा पत्ता, तुमचे जन्मस्थळ, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ओळखीसाठी तुमच्या शरीरावरील एखादी खूण यांसारखी माहिती विचारली जाईल.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

स्पष्टीकरणः वाहनांचा वर्ग निवडण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
 1. नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांमध्ये वैयक्तिक वापरासाठी साइड मोकर, मोपेड्स, तीन चाकी वाहने, वैयक्तिक वापरासाठी मोटर कार, काटा लिफ्टसह मोटर सायकलचा समावेश आहे.
 2. परिवहन वाहनात सार्वजनिक सेवा वाहन, मालवाहतूक, शैक्षणिक संस्था बस किंवा खाजगी सेवा वाहन समाविष्ट आहे;
 3. हलक्या मोटार वाहनात ट्रान्सपोर्ट वाहन किंवा ऑम्निबस यापैकी एकट्याचे एकूण वाहन वजन किंवा मोटर कार किंवा ट्रॅक्टर किंवा रोड-रोलर यापैकी कोणत्याही प्रकारचे वजन न केलेले वजन includes,,०० किलोग्रामपेक्षा जास्त नसते;
 4. मध्यम वस्तूंच्या वाहनात हलकी मोटर वाहन किंवा अवजड वस्तूंच्या वाहनाशिवाय कोणतीही मालवाहतूक समाविष्ट असते;
 5. अवजड वस्तूंच्या वाहनात कोणत्याही मालवाहतुकीचे एकूण वाहन वजन किंवा ट्रॅक्टर किंवा रोडरोलर यापैकी १२,००० किलोग्रामपेक्षा जास्त वजन नसलेले वजन असते.

वाहनांचा अनेक वर्ग निवडण्यासाठी Ctrl की दाबा आणि धरून ठेवा:

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

खालील सूचना वाचून उत्तर हो असल्यास Yes वर क्लिक करा. 

मला दोषी ठरविले गेले / अपात्र ठरविले गेले / माझा परवाना रद्द / निलंबित केला गेला / माझा परवाना रद्द झाला? (कृपया असल्यास निश्चित करा) (I have been Convicted/disqualified/my Licence was Cancelled/suspended/my Licence was revoked?  (Please Tick if Yes)

खालील सूचना वाचून उत्तर हो असल्यास Yes वर क्लिक करा. 

अर्जदार ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षित आहे का? (कृपया असल्यास निश्चित करा) (Is the applicant trained from Driving School?  (Please Tick if Yes)

घोषणा (Declaration):

घोषणा वाचून Yes बॉक्स मध्ये क्लिक करा आणि नंतर Submit बटन वर क्लिक करा. 

१. अपघाती मृत्यू झाल्यास मी माझे अवयव दान करण्यास तयार आहे? (कृपया इच्‍छित असल्‍यास टिक करा).

२. मी येथे असे जाहीर केले आहे की माझ्या उत्तम ज्ञान आणि विश्वासावर वर दिलेली माहिती खरी आहे - होय/नाही.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

हेही वाचा - फास्टॅग नसेल तरी आता नो टेन्शन ! नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं?

सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर अर्ज स्वीकारल्याचा मॅसेज येईल त्यावर Oवर क्लिक करा. पुन्हा Submit डेटा झाल्याचे दिसेल, तेथे OK बटन वर क्लिक करा, नंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट आणि खाली विविध फॉर्म PDF फाईल तुम्हाला मिळेल त्या डाऊनलोड करून ठेवा, नंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा. 

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

या प्रक्रियेनंतर तुम्हाला आपला फोटो आणि डिजिटल सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर टेस्टसाठी एक वेळ बुक करावी लागेल. वेळेची निवड करताना तुम्हाला फी भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येईल. 

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

फी भरल्यानंतर निर्धारित वेळेनुसार आरटीओ ऑफीसमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. यात यशस्वी ठरल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ऑनलाईन लर्निंग लायसन्स तुम्हाला ऑनलाईनच प्राप्त होईल. हे लर्निंग लायसन्स पुढच्या सहा महिन्यांपर्यंत वैध असेल. 

या सहा महिन्यांदरम्यान तुम्हाला पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर एका महिन्यानंतर आणि सहा महिन्यांच्या आत तुम्हाला दुसऱ्यांदा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. दुसऱ्यांदा टेस्टमध्ये यशस्वी ठरल्यानंतर पर्मनंट लायसन्स तुम्हाला मिळू शकेल.
हेही वाचा - गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments