महाराष्ट्र कुसुम योजना - सौर कृषी पंपासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

आपण या लेखात "महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजने बद्दल सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या कुसुम महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येऊन एक लाख सौर पंप उभारण्यात येतील.

महाराष्ट्र कुसुम योजना - सौर कृषी पंपासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

एक लाख सौर पंप उभारण्यासाठी 1969.50 कोटी खर्च अपेक्षित असून 30 टक्के म्हणजे 585 कोटी केंद्राकडून व 173 कोटी लाभार्थींकडून उपलब्ध होणार आहेत.  1211 कोटी इतका निधी राज्य शासन देणार आहे.  यामुळे पुढील 5 वर्षात प्रत्येकी 436 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर यामार्फत निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली.  या योजनेची अंमलबजावणी महाऊर्जामार्फत होणार आहे.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थाण महाभियान (कुसुम) राज्यात तीन घटकांतर्गत राबविण्यात येणार आहे.

घटक अ (Componant A) :- विकेंद्रीत पारेषण संलग्न जमिनीवरील Stilt Mounted सौर ऊर्जा प्रकल्प 

घटक ब (Componant B)  :- पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करणे.

घटक क (Componant C) :- पारेषण संलग्न सौर कृषीपंप संयंत्र आस्थापित करणे,

अभियान घटक “अ”

 1. सदर अभियान घटक महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल.
 2. या अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्‍यांना सिंचनासाठी उपकेंद्र पातळीवर 0.5 मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेपर्यंत प्राप्त मंजूरीनुसार 300 मेगावॅटचे सौर  ऊर्जेचे प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट.
 3. अभियान कालावधीत एकूण 5000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट.
 4. या अभियानामध्ये इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/ जल उपभोक्ता संघटना/सौर ऊर्जा विकासकाद्वारे महावितरणच्या उपकेंद्राच्या 5 कि.मी. क्षेत्रातील  त्यांच्या जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारु शकतील.
 5. अशा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कमाल रु.3.30/-प्रती युनिट या दराने घेण्याचे प्रस्तावित.
 6. ज्या ठिकाणी उपकेंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रकल्प उभारणीची मागणी आल्यास स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे आलेल्या लघुत्तम दराने महावितरण कंपनी वीज खरेदी करारनाम्याद्वारे 25 वर्षांच्या कालावधीकरिता खरेदी करेल.

अभियान घटक“ब”

 1. या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
 2. सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
 3. यात 2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ५ HP व त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित.
 4. सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)
 5. पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या 10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5% या दराने अंशदान घेणार.
 6. या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय  सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
 7. एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
 8. सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

अभियानघटक “क”

 1. सदर घटक अभियान महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल.
 2. शेतकऱ्यांना अस्तित्वात असणाऱ्या पारंपारीक पंपाऐवजी कृषि पंपाचे उर्जाकरण करुन शेतकऱ्‍यांना स्वत:च्या वीज वापराव्यतिरिक्त जादा वीज महावितरण कंपनीस विकून त्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध
 3. सदर अतिरिक्त वीजेपोटी निश्चित केलेल्या दराने महावितरण कंपनीद्वारे मोबदला देण्यात येईल.
 4. शेतकऱ्याकडे सद्य:स्थितीत असणाऱ्या पारंपारिक पध्दतीच्या कृषी पंपाच्या क्षमतेच्या २ पटीपर्यंतच सौर ऊर्जा निर्मिती करता येईल.
 5. शेतकऱ्याने ग्रीडला केलेल्या अतिरिक्त वीज पुरवठा आकारणी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या “फिड इन टेरिफ” प्रमाणे करण्यात येईल.
 6. ग्रीडला निर्यात करण्यात येणारी वीज सौर ऊर्जा पॅनलव्दारे निर्मिती झालेल्या वीजेच्या ५० टक्के पर्यंत मर्यादित असेल.
 7. निर्यात होणारी वीज रोहित्र क्षमतेपेक्षा जास्त होऊ नये याकरिता रोहित्र क्षमतेच्या ७० टक्के एवढी सौर क्षमता मंजूर करण्यात येईल. यात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 8. सदर कुसुम घटक “क” ची अंमलबजावणी केवळ संमिश्र वाहिनीवर (Unsaggregated Feeder)राबविण्यात येईल.
 9. या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषिपंप आस्थापित करण्यास प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम केंद्र शासनामार्फत व ३० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यास देण्यात येईल व लाभार्थी हिस्सा ४० टक्के राहील.

सुकाणू समिती

संपूर्ण अभियानाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी मा.मंत्री (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येईल. सदर अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्‍या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार योजनेत सुधारणा व बदल करण्याचे अधिकार सदर समितीस राहतील.

महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजना - ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस:

खालील लिंक वर क्लिक करा आणि Mahadiscom ची वेबसाईट ओपन करा. वेबसाईटची भाषा बदलण्यासाठी वरती एक टॅब आहे तिथे मराठी भाषा निवडा. 


Mahadiscom ची वेबसाईट ओपन झाल्यावर "ऑफ-ग्रीड सौर शेती पंपसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा" या टॅब वर क्लिक करा. 
ऑफ-ग्रीड सौर शेती पंपसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आता तुमच्या समोर "प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान ऑनलाईन अर्ज (नमुना-ए१)" या नावाने कुसुम योजनेचा ऑनलाईन अर्ज ओपन होईल. 

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान ऑनलाईन अर्ज (नमुना-ए१)

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान ऑनलाईन अर्जामध्ये खालील आवश्यक सर्व माहिती भरा. 

 1. अर्जदाराची वैयक्तिक माहिती:
 2. अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण
 3. ज्या शेता मध्ये सौर कृषी पंप आस्थापित करावयाचा आहे तेथील पत्ता ( 7/12 च्या उताऱ्याप्रमाणे)
 4. जलस्तोत्र आणि सिंचन माहिती
 5. कृषी तपशील
 6. विद्यमान पंप तपशील
 7. आवश्यक पंप तपशील
 8. सुधारित पॅनलचे स्ट्रक्चर आणि युनिर्व्हसल कंट्रोलर आस्थापणा तपशील (आवश्यक असल्यास?)

सुधारित स्ट्रक्चर पॅनल माहिती: सद्य:स्थितीमध्ये सौर पंप आस्थापित करण्यासाठी वापरण्यात येणारे सोलर पॅनलचे स्ट्रक्चर हे एका खांबावर आधारित आहे.परंतु प्रस्तावित सोलर पॅनलचे स्ट्रक्चरकरीता चार खांबावर आधिरीत तसेच सद्यस्तिथी स्ट्रक्चरपेक्षा उंच आहे.पॅनल खालील जागा कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुपालन , कांदाचाळ गोदाम इत्यादी करता वापरता येऊ शकते उपयुक्त उंची ८ फूट किंवा १० फूट या प्रकारचे आहे.

युनिर्व्हसल कंट्रोलर आस्थापणा माहिती: कुसूम योजने अंतर्गत आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर पंपासोबत युनिर्व्हसल कंट्रोलर आस्थापित केल्यास शेतकऱ्यांना सौर पंप कार्यरत नसताना सौर ऊर्जेवर निर्माण होणार वीज इतर उपक्रमांसाठी उदा. कडबा कुट्टी, दुध काढणी यंत्र, पिठाची गिरणी इ. चालविण्यासाठी करता येणार आहे.

बँक तपशील:

 1. बँक खाते नंबर
 2. खातेधारकाचे नाव
 3. आयएफएससी कोड
 4. बँकेचे नाव
 5. एमआयसीआर कोड
 6. शाखेचे नाव शाखेचे शहर/गाव 
घोषणापत्र:

१.कुसुम सौर कृषिपंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जल स्त्रोताची खोली नमुना ए 1 मध्ये नमूद केल्यानुसार किंवा चुकीच्या पाणी पातळीच्या रेकॉर्डमुळे पंप चालत नसेल तर, त्यास महाऊर्जा कार्यालय / पुरवठाधारक जबाबदार राहणार नाही. मला याची जाणीव आहे.
२.या योजनेंतर्गत पात्र होण्यासाठी मी सौर पंपाच्या केंद्रीय मूलभूत किंमतीचा लाभार्थी हिस्सा (सामान्य लाभार्थींसाठी 10 टक्के / अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 टक्के) देण्यास मी तयार आहे
3.सौरपंपाच्या दररोजची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मी जबाबदार आहे. मी ज्या ठिकाणी सोलर पंपाची मागणी केली आहे तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही. मला माहित आहे की सौर पंपाचे माझे काही नुकसान झाले तर त्या सर्वांसाठी मी जबाबदार राहील.
४.मी सौर पंप बसविण्याकरिता माझ्या शेतजमिनीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यास बांधिल आहे. तसेच सौर तपासणीसाठी मी अधिकारी, वेळोवेळी दुरुस्ती कर्मचार्‍यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन आणि त्यात अडथळा आणू देणार नाही किंवा अडथळा आणणार नाही.
5.या कराराच्या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या शेततळे / विंधन विहीर (बोअरवेल) / विहीर वर व ज्या सर्व्हे क्र / गट क्रमांकामध्ये सौर पंप आस्थापित केला आहे, त्या ठिकाणीच कायमस्वरुपी ठेवणार असल्याची हमी देत आहे. त्याची विक्री करण्यासाठी / एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मला महाऊर्जा कार्यालयाकडून लेखी परवानगी (ना हरकत प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक आहे आणि मी आज याची हमी देत आहे.
६.मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण, विक्री, तांत्रिक बदल किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.
७.सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास मी प्रथम माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी घेईन. मुदतीत असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला जाणीव आहे
८.सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षाचा आहे आणि सौर पॅनेल 5 वर्षे आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप अपयशी ठरल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे. या कालावधीत पंप अयशस्वी झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे
९. मी या सौर पंपाच्या स्थापनेत कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस मी जबाबदार राहील. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही..
१०.महावितरणकडून पारंपरिक वीज खरेदी बंधन (आरपीओ) अंतर्गत या सौर पंपाद्वारे निर्माण झालेली सौर उर्जा या बंधपूर्ततेसाठी वापरण्यास मी मान्यता देतो. वरील सर्व नियम व शर्ती माझ्या तसेच माझ्या वारसांवर बंधनकारक असतील.

वरील घोषणा पात्र वाचून झाल्यावर "वरील माहिती मला समजली असून / मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे." या टॅबच्या बॉक्स मध्ये क्लिक करा.

कागदपत्रे अपलोड करा(पीडीएफ फाइल अपलोड करा कमाल आकार ५०० केबी ):

अ. आवश्यक कागदपत्रे:

१. ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.
२. आधारकार्ड प्रत
3. रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत
४. पासपोर्ट आकाराचा छायाचित्र

ब. इतर कागदपत्रे (लागु असल्यास):

१. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला
२. शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
3. अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर "अर्ज सादर करा" या ऑप्शन वर किल्क करा. 
कुसुम योजने अंतर्गत सौर कृषी पंपसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

"अर्ज सादर करा" या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर "आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता" अशी नोटिफिकेशन येईल तेथे OK वर क्लिक करा.

नंतर तुम्हाला एक अर्जाची पोच पावती येईल त्याची प्रिंट कडून ठेवा, त्यामध्ये तुमचा लाभार्थी क्रमांक, तुमचे नाव, आधारकार्ड आणि तुमचा मोबाईल क्रमांक असेल.

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments