वृत्त विशेषसरकारी कामे

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

पीएफ काढणे, EPFO अकाउंट ट्रान्सफर करणे, केवायसी, वैयक्तिक ओळखपत्र, तसेच पीएफ संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पीएफ सभासदांना तक्रार करता येईल. भविष्य निर्वाह निधी ‘ईपीएफओ’ सभासदांना पीएफ खात्यात जमा झालेल्या व्याजाची खातरजमा करता येईल.

भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात पीएफ जमा झाला आहे की नाही याची खातरजमा पीएफ सभासदांना ऑनलाईन ईपीएफ पासबुक डाउनलोड करून करता येणार आहे. त्यानंतर जर व्याज मिळाले नसेल तर सभासदांना तक्रार करता येणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाऊंट संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्याची प्रोसेस:

भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास Grievance Management System मधून पीएफ सभासदांना तक्रार करता येईल. त्याशिवाय @socialepfo या ट्विटर हँडलवर देखील सभासदांना तक्रार करता येईल.

1) भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर https://epfigms.gov.in/ जा.

2) त्यानंतर Register Grievance वर क्लिक करा.

3) आता एक नवीन वेबपेज समोर येईल. ज्यात तुम्हाला स्टेटस निवडावा लागेल. यात पीएफ मेंबर, ईपीएस पेंशनर , एम्प्लॉयर किंवा अन्य मधून कोणतातरी एक पर्याय निवडावा लागेल. जर तुमच्याकडे यूएएन किंवा पेंशन ऑर्डर नसेल तर तुम्ही इतर पर्यायाची निवड करू शकता.

सूचना:- आपल्या तक्रारीच्या त्वरित निवारणासाठी, आपल्याकडे यूएएन / पीपीओ क्रमांक / स्थापना क्रमांक असल्यास योग्य स्थिती निवडा. इतरांची निवड फक्त तेव्हाच केली पाहिजे जेव्हा आपल्याकडे यूएएन / पीपीओ क्रमांक / स्थापना क्रमांक नसेल.

4) प्राॅव्हिडंड फंडच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही PF Member स्टेटस निवडता येईल. त्यानंतर तुमचा यूएएन आणि सिक्युरिटी कोड सादर करून Get Details वर क्लिक करावे. पुढे तपशील सादर करावा लागेल. ओटीपीसाठी क्लिक केल्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

5) ओटीपी सादर केल्यानंतर तुमच्या तपशीलाची छाननी होईल आणि तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला सादर करावी लागेल.

6) नंतर पीएफ खाते क्रमांकाची निवड करा, ज्याबाबत तुम्हाला तक्रार करायची आहे.

7) त्यानंतर तक्रार कशाशी संबंधित आहे त्याची माहिती द्यावी लागेल.

8) पुढे आवश्यक माहिती सादर करावी. तुमच्याकडे काही पुरावा असेल तो सादर करावा.

9) एकदा तुमची तक्रार नोंद करून झाली की Add वर क्लिक करून सबमिट करावे.

10) यानंतर तुमची ऑनलाइन तक्राराची नोंद होईल आणि तक्रारीचा नोंदणी क्रमांक रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर प्राप्त होईल.

भविष्य निर्वाह निधी (PF) तक्रारीची दखल घेतली कि नाही याची माहिती देखील याच वेबसाईटवरून घेता येईल. ज्यात View Status मध्ये तक्रार नोंदणी क्रमांक टाकून माहिती मिळेल.

https://epfigms.gov.in/Status

हेही वाचा – भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस (PF-Provident Fund)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.