भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण या लेखामध्ये आपल्या ईपीएफ अकाउंट मध्ये ऑनलाईन  KYC कशी अपडेट करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आता नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडामधून पैसे काढणं सोपं झालंय, याचं मुख्य कारण तुम्ही ऑनलाईन पीएफ क्लेम करू शकता. पण अजून तरी 50 टक्के कर्मचाऱ्यांनी आपली KYC युनिव्हर्सल नंबराला ( UAN ) जोडलेली नाही. त्यामुळे पीएफ खाताधारक EPFO चा ऑनलाईन सेवेचा फायदा घेऊ शकणार नाही. सरकारनं ईपीएफओच्या सीमेत येणाऱ्या कंपनीज आणि संस्थांच्या पीएफधारकांना KYC 100 टक्के पूर्ण करायला सांगितलंय.

आपले ज्या खात्यामध्ये PF चे पैसे आहेत त्याची जर KYC पूर्ण झालेली असेल तर त्यात PF चे पैसे लगेच ट्रान्सफर होणार आहेत. जर PF खात्यामध्ये बँक डिटेल्स नसतील, तर Claim Request रद्द होऊ शकते. तसेच KYC पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला SMS द्वारे कुठलाही अलर्ट मिळणार नाही.

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस:

KYC अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम ईपीएफओ युएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन तुम्ही लॉगिन करा.

लॉगिन करण्यासाठी तुमचा UAN नंबर ,पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे. पहिल्यांदाच लॉगिन करत असाल तर UAN नंबर ऍक्टिव्हेट करावा लागेल. 

हेही वाचा - EPFOपोर्टल वरून यूएएन (UAN) नंबर कसे ऍक्टिव्हेट करावे.

KYC अपडेट करताना Manage टॅब मध्ये खालील पर्याय मध्ये बदल करायचा आहे. 

 1. Basic Details
 2. Contact Details 
 3. KYC 

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर


मूलभूत तपशील सुधारित करा:

 1. जर तुम्हाला आधार नंबर ,नाव ,जन्म तारीख ,लिंग व कंपनीचे नाव यामध्ये बदल कसा करायचा असेल तर Manage या ऑपशन वर जाऊन Basic Details ऑपशन वर क्लिक करा. 
 2. यामध्ये तुम्ही आधार नंबर ,नाव ,जन्म तारीख ,लिंगकंपनीचे नाव यामध्ये बदल करू शकता. 
 3. सर्व माहिती टाकल्यावर Update या ऑपशन वर क्लिक करा. 
 4. व नंतर जो Confirmation Massage येईल तिथे Yes वर क्लिक करा.
 5. त्यानंतर तुमची माहिती व्हेरिफाय होईल.
भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर

संपर्क तपशील बदला: 

 1. जर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि मेल ID अपडेट करायचा असेल तर पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन Contact Details या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
 2. तिथे तुम्हाला Change Mobile NumberChange Mail id वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि मेल id टाकायचा आहे. व Get Authorization Pin वर क्लिक करा व OTP नंबर टाका. 
 3. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID अपडेट होतील.
भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या सविस्तर

 पूर्ण KYC अपडेट कशी करायची:

 1. पूर्ण KYC अपडेट करण्यासाठी  पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन KYC या ऑपशन वर क्लिक करा.
 2. पॅन, आधार, बँक अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन एक एक पर्यायावर क्लिक करा.
 3. तुमची माहिती भरा आणि सबमिट करा.
 4. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल ते पडताळून पाहायला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सांगू शकता.
 5. ते व्हेरिफाय झालं की ऑनलाईन सुविधा सुरू होईल.

EPFO पोर्टल वरती KYC अपडेट कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

युएएनशी संबंधित केवायसीमध्ये आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन आणि मोबाइल नंबर लागतो. जेव्हा PF खातेधारक केवायसी युएएनसोबत लिंक करतो, तेव्हा PF संबंधी माहिती मोबाइलवर मिळवू शकतो. केवळ आधार कार्ड, पॅन यासारख्या सत्यापित केवायसीची सेवा कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी विचारात घेण्यात येईल. तुम्हाला PF काढायचा असेल आणि KYC अपडेट असेल तर 3 दिवसांत पैसे मिळू शकतात.

हेही वाचा - भविष्य निर्वाह निधी (PF) ऑनलाईन कसा काढावा ?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments