आपण या लेखामध्ये भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी भोगवटादार वर्ग १ करणे नियम काय आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. महसूल कायद्याअंतर्गत प्रतिबंधीत सत्ताप्रकाराने आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी मालकी हक्काने देणे यामध्ये समाविष्ट आहे.
दिनांक ०८ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ हा सुधारीत नियम राजपत्रात प्रसिध्द केला आहे. या सुधारीत नियमामुळे आता कृषीक, निवासी, वाणिज्यिक किंवा औदयोगिक प्रयोजनासाठी प्रतिबंधीत सत्ताप्रकाराने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी मालकी हक्काच्या होणार आहेत.
जर शासनाने प्रदान केलेल्या उपरोक्त जमिनींबाबत लादलेले नियम ,अटी व शर्तींचा भंग झाला तर अशा जमिनी मालकी हक्काच्या होणार नाहीत. तथापि, अटी व शर्तींचा असा झालेला भंग सक्षम प्राधिकार्याने नियामानुकूल केला असल्यास त्या मालकी हक्कामध्ये रूपांतरीत करता येतील. परंतु हा नियम कुळवहीवाट, वतन व इनाम कायदा, कमाल जमीन धारणा कायदा या कायद्याखाली प्रदान केलेल्या जमिनींना लागू होणार नाही.
वरील प्रमाणे भोगवटादार वर्ग २ धारणाधिकारावर किंवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील प्रमाणे रूपांतर अधिमूल्य शासनाला अदा करावे लागेल.
हे उपरोक्त रूपांतरणाचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले असल्यामुळे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय (महसुल शाखा) किंवा तहसिलदार कार्यालय येथे अर्ज करता येईल. अर्जासोबत संबंधीत जमिनीच्या हक्काबाबत असणारी साक्षांकीत दस्ताऐवज, वार्षिक दर विवरणपत्र आणि नियमात नमूद रक्कम भरण्यास तयार असल्या बाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.तसेच जर शासनाच्या त्यावेळी प्रचलित असलेल्या धोरणाप्रमाणे भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनीचा धारणाधिकार, भोगवटादार वर्ग दोनमध्ये रुपांतरीत करतांना अशा धारकाने शासनास प्रदान केलेल्या अधिमुल्याची रक्कम, वसूल करावयाच्या आधिमूल्याच्या रकमेत समायोजित करण्यात यावी.
1)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनी ज्या प्रादेशिक विकास आराखडयात शेती/ नाविकास वापर विभागात स्थित आहेत
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्या दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्या दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५%
2)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनी ज्या प्रादेशिक विकास आराखडयात अकृषिक (बिनशेती) विभागात स्थित आहेत
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) बिनशेतीच्या दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) बिनशेतीच्या दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५%
3)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या व सदयःस्थितीमध्ये नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियेाजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी – ज्यांचा विकास आराखडयाप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय आहे किंवा बिनशेती वापर अनुज्ञेय नाही अशा जमिनी
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५ %
4)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
वाणिज्यीक अथवा औदयोगिक प्रयोजनासाठी कब्जेहक्काने किंवा भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६० %
5)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
रहिवास प्रयोजनासाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६०%
6)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या २५%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५%
7)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या आणि आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भेागवटयात असलेल्या जमिनी
दिनांक ०८.०३.२०१९ या दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५%
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर आकारावयाची अधिमूल्य रक्कम:
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५%
8)जमीन ज्या क्षेत्रात समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर:
सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जेहक्काने प्रदान केलेल्या आणि आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भोगवटयात असलेल्या जमिनी.

0 Comments