RTIमाहिती अधिकार

माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना

मागील लेखा मध्ये आपण माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना पाहिल्या. आता आपण माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना आहेत त्या पाहणार आहोत.

माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील कधी दाखल करावे:

  • प्रथम अपीलीय अधिकार्‍याचा निकाल असमाधानकारक असेल तर.
  • अपीलीय अधिकार्‍याने दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.
  • प्रथम अपीलीय अधिकारी यांनी तुमचा RTI अर्ज नाकारला असेल तर.
  • प्रथम अपीलीय अधिकार्‍याने दिलेल्या मुदतीमध्ये अर्जावर काही ही निर्णय दिलेला नसेल तर.
  • जर सहाय्यक लोकमाहिती अधिकार्‍याने राज्य/केंद्रीय लोकमाहिती अधिकार्‍याकडे किंवा राज्य/ केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पाठवण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिलेला असेल तर.
  • जर सरकारी अधिकार्‍याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हांला वाटत असेल तर.

अपील कोठे दाखल करावे?

  • राज्य माहिती आयोगाकडे (जर प्रकरण राज्याच्या सरकारी अधिकार्‍यांशी संबंधित असेल तर).
  • केंद्रीय माहिती आयोगाकडे (जर प्रकरण केंद्राच्या सरकारी अधिकार्‍यांशी संबंधित असेल तर).

अपीलासाठी मुदत:

  • प्रथम अपीलीय अधिकार्‍याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत.
  • अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण राज्य/केंद्रीय माहिती आयोगास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.

अपीलासाठी अर्ज लिहिणे:

  • एका पांढर्‍या कागदावर तुमचा अर्ज लिहा किंवा इंडिया डेव्हलपमेंट गेटवे पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा.
  • अर्ज हस्‍तलिखित किंवा टंकलिखित असू शकतो.
  • अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्‍ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.

अर्जाच्‍या फॉर्मची तयारी करणे:

  • हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.
  • एका पानावर अनुक्रमणिका तयार करा आणि त्यामध्ये अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची पृष्ठक्रमांकासह नावे लिहा.
  • प्रत्येक कागदपत्राच्या ५ प्रती तयार करा (2र्‍या अपीलाचा अर्ज, माहितीची विनंती, 1ल्‍या अपीलाचा अर्ज, लोकमाहिती अधिकार्‍याला फी दिल्याचा पुरावा, इ.) आणि त्या स्वसाक्षांकित करा. तुम्ही स्वतःसाठी आणखी एक प्रत तयार करू शकता.

अर्ज कसा पाठवावा?

  • अर्ज ५ प्रतींसह केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच पाठवावा.
  • तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा.
  • केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज ऑनलाईन ही पाठवाता येतो. त्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:

  • सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत देण्‍यात येतो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.
  • राज्य/केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठीची कालमर्यादा मोजली जाते.

राज्य/केंद्रीय माहिती आयोगानेदिलेला निर्णय दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. मात्र असंतुष्ट लोक अधिकारी राज्य/केंद्रीय माहिती आयोगाविरूध्‍द विरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतात.

माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – माहितीचा अधिकाराचा वापर कसा करावा आणि त्याबाबतची सूत्रे (RTI)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.