ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर का लढवू शकत नाहीत? जाणून घ्या सविस्तर

आपण या लेखामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षं मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आपापल्य़ा चिन्हांवर का लढवत नाही याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.जसे बघितले गेले तर जे पक्ष आहेत त्यांची चिन्ह मुख्यतः रेल्वेचं इंजीन, धनुष्यबाण, पंजा, घड्याळ, आणि कमळ हे आपापल्या चिन्हावर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवतात.पण तशा ग्रामपंचायतीच्या निवडणुका का लढवल्या जात नाहीत हे पाहणार आहोत. 

ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर का लढवू शकत नाहीत? जाणून घ्या सविस्तर


भारतीय राज्यघटनेतील कायदा काय सांगतो?

भारतीय राज्यघटनेतील कायद्यानुसार गावातील ग्रामपंचायतची निवडणूक राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर लढू शकत नाही असे कायद्यात स्पष्ट सांगितले आहे. 

भारतीय राज्यघटनेतील 73 वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. 1992 साली 73 वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झालं आणि त्यानुसार 24 एप्रिल 1993 पासून देशात पंचायतराजची अंमलबजावणी सुरू झाली. हा कायदा असे सांगतो कि ग्रामपंचायत निवडणुकीचा संबंध थेट गावातल्या लोकांशी असतो. यात राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढल्यास ग्रामस्थांमध्ये परस्पर दुही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक ही पक्षांच्या चिन्हावर लढवली जाऊ नये.

गाव ही एक स्वतंत्र बॉडी राहावी, त्यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये, असाही या कायद्यामागचा उद्देश आहे.

तसेच आता सध्या गावाचा कंट्रोल हा ग्रामसभेकडे असतो. गावातले लोक एकत्र येऊन गावासाठी निर्णय घेतात. पण, समजा पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढल्यास त्या गावाचा कंट्रोल एखाद्या विशिष्ट पक्षाकडे जाईल आणि मग पक्ष म्हणेल ती पूर्व दिशा राहिल. हे कायद्याला अभिप्रेत नाही."

"गावाचं क्षेत्र लहान असतं, त्यामुळे लोकसंख्या कमी असते. शिवाय गावातील लोक एकमेकांना चांगलं ओळखत असतात. ते एखाद्या पक्षाला सपोर्ट करत असले तरी त्यांची विचारधारा पार्टी लाईनवर नसते. त्यांच्यात पक्षअभिनिवेश नसतो. इथं निवडणूक संपली की विरोध संपला असं असतं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवत नाही."

तसेच निवडणुकीसाठी गावात पॅनल्स तयार केले जातात. व ज्यांना सरपंच पद हवं असतं, ते सगळ्यात आधी आपल्या पॅनेलमध्ये कुणाला घ्यायचं म्हणजे कोणत्या वॉर्डात कुणाला उभं करायचं हे ठरवतात.

हेही वाचा - आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला, हे जाणून घ्या सविस्तर

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments