बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात . कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार”(रोजगार व सेवाशर्ती नियमन ) कायदा १९९६ ची तरतूद केली आहे.या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) २००७ देखील मंजूर केले.
ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार ( रोजगार व सेवाशर्ती नियमन ) अधिनियम ” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ५ शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली.
अधिनियम २०११ ,२०१५ व २०१८ नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळात अध्यक्ष तसेच शासन, मालक व कामगार ह्यांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी मंडळात घेण्यात घेण्यात आले. नियम ३५ (१) नुसार मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे. मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
उद्देश आणि उद्दीष्टे:
- ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
- बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
- लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
- कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
- लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
- बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
- कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
- प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
- नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना:
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु ३०,०००/
- माध्यान्ह भोजन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- आवश्यक अवजारे खरेदीसाठी रु. ५०००/
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
- सुरक्षा संच पुरवणे
- अत्यावश्यक संच पुरवणे
- इयत्ता १ ते ७ विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २५००/
- इयत्ता ८ ते १० विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५०००/
- इयत्ता १० ते १२ विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/
- पदवी विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/
- वैद्यकीय पदवी विध्यार्थ्यांसाठी रु. १,००,०००/
- अभियांत्रिकी पदवी विध्यार्थ्यांसाठी रु ६०,०००/
- पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २०,०००/
- पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २५,०००/
- MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
- नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २०,०००/
- गंभीर आजाराच्या उपचारार्थ १,००,०००/
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १,००,०००/ मुदत ठेव
- कायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी करणे
- कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५,००,०००/(कायदेशीर वारसास)
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २,००,०००/(कायदेशीर वारसास)
- अटल बांधकाम कामगार आवास योजना रु. २,००,०००/
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता रु. १०,०००/
- कामगारराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रु. २४,००००/
- घर खरेदी किंवा घरबांधणी करीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम रु. ६,००,०००/ अथवा रु. २,००,०००/ अनुदान
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
- नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी:
बांधकाम कामगार नोंदणीची ऑनलाईन प्रोसेस:
- वैयक्तिक माहिती:
- कायमचा पत्ता
- कौटुंबिक तपशील
- बँक तपशील
- नियोक्ता तपशील
- ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील
0 Comments