प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) 7500 लाख निधी जाहीर - 2020-21

आपण प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2020-21 मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर देखील करायला सुरुवात केली आहे. आपल्या घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

हेही वाचा - प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी  ऑनलाईन कशी पाहायची?जाणून घ्या सविस्तर.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2020-21 आर्थिक वर्षात मागणी क्र.एन -3, 2505- ग्रामीण रोजगार, 60, इतर कार्यक्रम, 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (01) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमातंर्गत योजना, (01) (05) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (राज्य हिस्सा 40 टक्के ) (कार्यक्रम ) 31-सहायक अनुदाने  (2505ए111) या लेखाशिर्षाखाली रु.7500.00 लाख इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेकरिता सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 7500 लाख निधी जाहीर


प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण 2020-21:

१. वित्त विभागाच्या संदर्भाधीन 16.4.2020 रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली मारामारीची परिस्थिती विचारात घेऊन सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. तसेच संदर्भाधीन क्र. २ अन्वये वित्त विभागाने कार्यक्रमातंर्गत योजनांच्या ३३ टक्के मर्यादेत खर्चासाठी नियोजनात्मक सूचना केल्या आहेत. तथापि Covid-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण )या योजनेसाठी वित्त विभागामार्फत सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर १०० टक्के निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमातंर्गत नियोजन विभागाने वाचा क्र. ३ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण )या योजनेसाठी सन 2020-21 या आर्थिक अर्थसंकल्पित निधीपैकी (2505ए111) 40 टक्के राज्य हिस्सा या लेखाशिर्षाखाली रु.7500.00 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग याना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.

२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येणार आहे. कोविड -१९ मुळे राज्याची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची राहण्याची शक्यता असल्याने सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करण्यात येणार आहे. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय /उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण संबंधित उप आयुक्त, समाजकल्याण,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व उदयोग, नियोजन विभाग याना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.

३. विभाग प्रमुख /नियंत्रक अधिकारी यांनी अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी त्याच घटकांवर खर्च होईल याची दक्षता घेण्यात येणार आहे,जेणेकरून शासनाला या योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येणार आहे.

४. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभागप्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका ,वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि . 16.04.2020 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे .

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि . 16.04.2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.99/ व्यय -14, दि .27.01.2021 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.

हेही वाचा - जमीन NA (बिगर शेती) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

1 Comments

  1. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी कीती अनुदान मिळते..

    ReplyDelete