कृषी यांत्रिकीकरण योजना - शेतकऱ्यांना कृषी औजारे/यंत्र ट्रॅक्टर खरेदीसाठी 19 कोटीचा अनुदान निधी जाहीर

संदर्भाधीन दि .12 सप्टेंबर, 2018 च्या शासन निर्णयान्वये , राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतंर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक -3, वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे/यंत्र खरेदीसाठी अनुदान देणार व  घटक क्र-4, कृषी औजारे/यंत्रे बँकाना अनुदान देणार. या घटकांची अंमलबजावणी सरकार करणार आहे. सदर घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना - शेतकऱ्यांना कृषी औजारे/यंत्र ट्रॅक्टर खरेदीसाठी 19 कोटीचा अनुदान निधी जाहीर

कृषी यांत्रिकीकरण योजना:

शेतकऱ्यांना कृषी औजारे/यंत्र ट्रॅक्टर खरेदीसाठी 19 कोटीचा अनुदान निधी जाहीर:

या योजनेसाठी सन 2020-21 या वर्षात रु.7600 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. वित्त विभागाने संदर्भाधीन दि.10 नोव्हेंबर, 2020 च्या परिपत्रकान्वये, ज्या विभागामार्फत मत्ता निर्मिती व पर्यायाने रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबींसाठी सन 2020-21 साठीचा अर्थसंकल्पित निधी 75 टक्के वितरणास मान्यता दिलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेंअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना यंत्र व औजारासाठी तसेच कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. त्याचप्रमाणे , कृषी औजारे बँक स्थापनेमुळे मत्ता निर्माण होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या तरतूदीच्या 75 टक्के म्हणजेच रु.57 कोटी निधी वितरित करण्यास अनुमती देण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने मंजूर तरतूदीच्या 25 टक्के निधी वितरणास मान्यता दिलेली आहे.

वित्त विभागाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा 25 टक्के निधी वितरित करण्यास दिलेली अनुमती विचारात घेऊन, सदर योजनेसाठी मंजूर तरतूद रु.7600 लक्षच्या 25 टक्केच्या मर्यादेत रु.1900 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन सदर निधी आयुक्त (कृषी ) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

1) सन 2020-21 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, रू.1900 लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

2) या शासन निर्णयान्वये, सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता रु.1900 लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषी ) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) वितरित करण्यात आला आहे.

3) सदर योजनेंतंर्गत मंजूर केलेला रु.1900 लक्ष निधी (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) खालील लेखाशीर्षाखाली चालू वर्षी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून खर्ची करणार. 

मागणी क्रमांक :- डी -3

2401- पीक संवर्धन,

113-कृषी अभियांत्रिकी 

(00) (18) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना,

(2401A913) 33 अर्थसहाय्य.

4) या योजनेंतंर्गत वितरित करण्यात आलेला निधी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातंर्गत अनुज्ञेय बाबींवर खर्ची टाकावा तसेच, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे जमा करणार.

5) अनुदानाची रक्कमेचे वितरण महा-डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार.

6) सदर योजनेंतंर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 50% किंवा रु.1.25 लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 40% किंवा रु.1 लाख यापैंकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार. 

7) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (नि.व गु. नि.), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन, उद्दिष्टनिहाय अंमलबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्गमित करणार. सदर योजनेची अंमलबजावणी  करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला शेतकरी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक /आर्थिक लक्षांक निर्धारित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा. 

हेही वाचा - ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी 2020

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments