मधुमक्षिका पालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-र्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

मधुमक्षिका पालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

मधुमक्षिका पालन योजना:

मधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. मध हे एक शक्तिदायक, पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. केवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाशांकडून होणाऱ्या परागीकरणामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.

त्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून  देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत “मधुमक्षिका पालन ” या घटकाचा समावेश करण्यात  आलेला आहे.

उद्देश:

१. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या गाव समूहात “मधुमक्षिका पालन” या घटकांतर्गत मधुमक्षिका पालनाद्वारे भूमिहीन व्यक्ती/ शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे. 

२. ग्रामीण भागातील मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना मिळावी व आहारामध्ये मधाचा समावेश व्हावा.

लाभार्थी निवडीचे निकष:

प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) लाभार्थी निवडताना भूमिहीन व्यक्ती, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने लाभार्थ्यांची निवड करावी.

अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:

लाभार्थी 

1. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज आवश्यक कागदपत्रासह अपलोड करावा.

2. निवडलेल्या लाभार्थीने गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत मधुमक्षिका वसाहत, संच व मध काढणी यंत्र इत्यादींची खरेदी करावी.

3. पूर्वसंमती मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत मधुमक्षिका व इतर आवश्यक बाबींची खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.

4. मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.

5. मधुमक्षिका पालन या  घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड करावे.

अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.  


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments