गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसान भरपाई निधी मंजूर

राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसान भरपाई निधी मंजूर

राज्यात माहे डिसेंबर 2019 - जानेवारी 2020 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्ताांमार्फत पाठविण्याच्या सूचना शासन पत्र दिनांक ३/१/२०२० अन्वये देण्यात आला होता. सदर सूचनानुसार संयुक्त पंचनामे झाल्यानांतर 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव कृषी आयुक्ताांकडून संदर्भाधीन क्रमांक 2 ते 4 येथील पत्रान्वये प्राप्त झाला आहे. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमतीच्या दिनांक १६/१२/२०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

माहे फेब्रुवारी ते मे ,2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र "अ" नुसार एकूण रू. 24776.52 लक्ष इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात येणार:

i) प्रचलित नियमानुसार शेती/बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्याांना अनुज्ञेय राहील.

ii) प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी करणार.

iii) बाधित शेतकऱ्यांना बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार.

iv) कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत देणार नाही.

v) मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणतीही बँक कोणत्याही प्रकारची  वसुली करणार नाही असे आदेश दिले आहेत.

लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.

हेही वाचा - "शरद पवार ग्रामसमृद्धी योजना" ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यास सुरवात ! असा करा अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments