गाव नमुना ८-ड विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना ८-अ, ८-ब, आणि ८-क उतारा विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. या लेखामध्ये आपण गाव नमुना ८-ड उतारा, विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना ८ ड विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना ८ ड:

गाव नमुना आठ-ड म्हणजे तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्याकडेची दैनिक रोख रकमेची नोंदवही ( कॅशबुक ) होय. तलाठी आणि मंडलअधिकारी यांनी त्यांच्याकडे जमा झालेल्या किंवा त्यांनी रोख वसूल केलेल्या जमीन महसूल प्रदानाच्या तसेच इतर शासकीय येणे यांच्या रोख रकमेची नोंद दररोज या नोंदवहीत करतो. 

या नोंदवहीत दररोजचा हिशोब लिहायचा असतो त्यामुळे जर एखाद्या दिवशी वसूल नसेल तरीही त्या दिवशी "काही रोख वसूल नाही" अशी नोंद या नोंदवहीत करतो. 

तलाठी स्वतःच्या ताब्यात काही ठराविक रक्कम रोख स्वरूपात पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ ठेऊ शकत नाही. (रकमेबाबत अद्ययावत तरतूद बघावी.) अशी रक्कम पंधरा दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत जमा करणे बंधनकारक आहे. ही रोख रक्कम शासनाने ठरवून दिलेल्या रोख रक्कमेपेक्षा जास्त किंवा कमी असली तरीहि पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ तलाठी यांच्या ताब्यात राहिल्यास संबंधित तलाठ्यावर शासकीय पैशाची अफरातफर केल्याचा दोष लागू शकतो. 

गाव नमुना आठ-ड मध्ये 'जमा' आणि 'खर्च' असे दोन भाग आणि एकूण ८ स्तंभ आहेत.'जमा' म्हणजे प्राप्त रक्कम आणि 'खर्च' म्हणजे शासकीय कोषागारात जमा केलेली रोख रक्कम. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ १ मध्ये रोख रक्कम वसूल केल्याचा दिनांक लिहिलेला असतो. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ २ मध्ये कोणत्या बाबीसाठी सदर रोख रक्कम वसूल केली आहे ती बाब नमूद केलेली असते. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ ३ मध्ये रोख रक्कम वसूल केल्यानंतर दिलेल्या पावतीचा क्रमांक नमूद केलेला असतो. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ ४ मध्ये रोख वसूल रक्कम रु. पै. यांत नमूद केलेली असते. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ ५ मध्ये जर तलाठी यांनी ही रोख वसूल रक्कम ज्या दिवशी शासकीय कोषागारात जमा केली तो दिनांक केलेली असते.  

गाव नमुना आठ-ड स्तंभ ६ मध्ये तलाठी यांनी कोणत्या बाबीची रोख रक्कम शासकीय कोषागारात जमा केली ती बाब नमूद केलेली असते.  

गाव नमुना आठ-ड स्तंभ ७ मध्ये शासकीय कोषागारात जमा केलेल्या रोख रकमेचा चलन क्रमांक नमूद केलेली असतो. 

गाव नमुना आठ-ड स्तंभ ८ मध्ये शासकीय कोषागारात किती रोख रक्कम जमा केली ती रक्कम रु. पै. यात नमूद करावी. शेवटी एकूण जमा रक्कम, शासकीय कोषागारात जमा केलेली रोख रक्कम आणि शिल्लक यांचा हिशोब लिहिलेला असतो. 

गाव नमुना ८ ड विषयीची संपूर्ण माहिती

मंडलअधिकारी यांनी रोज गाव नमुना आठ-ड ची पडताळणी करावी. तसेच सज्यास भेट देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यानेही प्रत्येक भेटीत गाव नमुना आठ-ड तपासावा. 

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments