गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक) विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना ९-अ, गाव नमुना ९-ब विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखामध्ये गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गाव नमुना नऊ म्हणजे दैनिक जमा पुस्तक आहे जे अलग करण्याच्या पावत्यांसह शासनाकडून पुरविण्यात येते.

गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक) विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक):

  1. गाव नमुना नऊच्या प्रत्येक पावतीवर तहसिलदार कार्यालयाचा गोल शिक्का असणे आवश्यक आहे. 
  2. खातेदाराने वेगवेगळ्या खात्यात केलेल्या प्रदानासाठी वेगवेगळ्या, स्वतंत्र पावत्या द्याव्या. 
  3. एकाच खात्यावर, एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा रक्कम प्रदान करतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या, स्वतंत्र पावत्या द्याव्या. 
  4. पावती देताना, पावतीच्या स्थळप्रतीवर मागच्या बाजूला, पावती दिल्याचे प्रतीक म्हणून, पैसे देणाऱ्याची सही घ्यावी. 
  5. दिवसाच्या अखेरीस, त्या दिवसात दिलेल्या शेवटच्या स्थळप्रतीच्या मागच्या बाजूला जमीन महसूल, स्थानिक उपकर यांची हातात असलेली शिल्लक रक्कम वेगवेगळी लिहून ठेवावी. 
  6. पावती पुस्तकावरील प्रत्येक पावतीवर क्रमांक असतो, त्यामुळे पुस्तकातील प्रत्येक पावतीचा वापर करावा. चुकून एखादी पावती खराब झाली तर अशी पावती वेगळी न करता, स्थळप्रतीलाच टाचून ठेवावी. 
  7. टपालाद्वारे आलेल्या धनादेशाबाबत, तो धनादेश खात्यात जमा झाल्यावर, त्याची पावती बनवून संबंधितास टपालाने पाठवावी. 
  8. धनादेशाद्वारे प्रदान करणाऱ्या खातेदारास, धनादेश तहसिलदार यांच्या नावाने देण्यास सांगावा. जरूरतर धनादेशाच्या स्थळप्रतीवर किंवा छायांकित प्रतीवर तात्पुरती पोहोच द्यावी. धनादेश खात्यात जमा झाल्यावर, त्याची पावती बनवून संबंधितास द्यावी. 
गाव नमुना ९ (दैनिक व जमापुस्तक) विषयीची संपूर्ण माहिती

 
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments