रेशन कार्ड हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाना राज्य सरकारांनी दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे. ते बर्याच भारतीयांना ओळखण्याचे सामान्य प्रकार म्हणूनही काम करतात. एनएफएसए अंतर्गत, भारतातील सर्व राज्य सरकारांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अनुदानित धान्य खरेदी करण्यास पात्र ठरलेल्यांना ओळख दिली आहे आणि त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन दिले आहे. एनएफएसए अंतर्गत दोन प्रकारची शिधापत्रिका आहेत.
या लेखामध्ये रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? आणि आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते कसे तपासायचे ते पाहूया. जर आधार प्रमाणीकरण झाले नसेल तर लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण रेशन स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन करा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद.
रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस:
सर्व प्रथम खालील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन करा.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर "ऑनलाईन सेवा" या बॉक्स मध्ये "ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली" या लिंक वर क्लिक करा.
आता आपल्याला "Enter Captcha" मध्ये खालील कॅप्चा कोड टाका आणि "Verify" वर क्लिक करा.
कॅप्चा कोड व्हेरिफाय केल्यानंतर १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक किंवा जुना शिधा पत्रिका क्रमांक टाकून "View Report" वर क्लिक करा.
"View Report" वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्डचा अहवाल दिसेल त्यामध्ये "Print Your Ration Card" या ऑप्शन वर क्लिक करा.
Print Your Ration Card" या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्ड थोडा वेळ लोड होईल त्यानंतर तुम्ही पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता.
रेशनकार्ड लोड झाल्यावर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Export ऑप्शन मध्ये रेशनकार्ड डाउनलोड करण्यासाठी विविध पर्याय आहेत त्यामध्ये आपण PDF हा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करा.
रेशन कार्डची PDFफाईल सेव्ह केल्यावर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्व माहिती. तसेच आधार प्रमाणीकरण तपासण्यासाठी "FAMILY MEMBERS" या बॉक्स मध्ये "Aadhar Auth" मध्ये जर "Y" असे लिहिली असेल तर आधार प्रमाणीकरण झालेले आहे किंवा "N" असेल तर आधार प्रमाणीकरण झालेले नाही.
अस्सल आवृत्ती रेशनकार्डसाठी, त्यावर संबंधित अधिका-यांनी योग्यरित्या सही केली पाहिजे आणि शिक्के मारले पाहिजेत.
ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसेल त्यांनी लवकरात लवकर रेशन स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन करा नाहीतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळणार नाही.
सूचना: हे रेशन कार्ड कोणत्याही सरकारी योजनांमध्ये किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी ओळखल्या जाणार्या पुरावा च्या कागदपत्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही.
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
0 Comments