आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट द्यावी लागणार नाही, केंद्र सरकार आणतंय नवा नियम

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी ड्रायव्हर लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्टच्या आवश्यकतेतून सूट मिळणार असून ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या मान्यतेसाठी प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. .

मंत्रालयाने म्हटले आहे की, या हालचालीमुळे परिवहन उद्योगाला खास प्रशिक्षित वाहनचालक घेण्यासही मदत होईल, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारेल आणि रस्ते अपघात कमी होतील. नागरिकांना दर्जेदार ड्रायव्हर प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने या केंद्रांद्वारे सखोल आवश्यकता व त्या पूर्ण करण्याची प्रक्रिया प्रस्तावित केली आहे.

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट द्यावी लागणार नाही, केंद्र सरकार आणतंय नवा नियम

अगोदर ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढण्यासाठी आरटीओ ऑफिस ला फेऱ्या मारायला लागायच्या. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स लवकर मिळण्यासाठी अनेक जण दलालांचीही मदत घेत होते. आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कारण हि प्रक्रिया सरकारने ऑनलाईन केली आहे. यामुळे जनतेला होणारा  त्रास कमी होणार आहे. तसेच आता सरकार यात आणखी एक मोठा बदल करणार आहे.

हा बदल म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात एक तरतूद करत आहे. यानुसार, वाहन चालवण्यासाठी आता कुणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही. यामध्ये ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरवरून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कुणालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या विशेष योजनेवर काम सुरू असून यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचनादेखील जारी केली आहे. तसेच यावर लोकांची मतेही मागवली आहेत.

अधिकृत प्रकाशनात असेही म्हटले आहे की, 29 जानेवारी 2021 रोजीची मसुदा अधिसूचना सार्वजनिक सल्लामसलतसाठी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली गेली असून या टप्प्यानंतर औपचारिकपणे दिली जाईल.

ड्रायव्हिंग प्रशिक्षण सेंटर्सला मान्यता:

या योजनेमध्ये मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण सेंटर्सला मान्यता देणार आहे. जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीही मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

लोकांच्या सूचनांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आधिसूचनेचा ड्राफ्ट आपल्या वेबसाइटवरही टाकला आहे. यात आपणही आपल्या सूचना देऊ शकता.
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Post a Comment

0 Comments