ग्रामीण भागात 100% अनुदानावर रूफटॉप सोलर योजना सुरू - Model Solar Village Project For PVTG Habitations/Padas/Village/Remote Village

केंद्र शासनाकडून दरवर्षी विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुदान, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत व अदिम जमाती विकास कार्यक्रम या योजने अंतर्गत राज्य शासनास अनुदान प्राप्त होत असते. या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून निवडक प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येतात. ज्या ठिकाणी विदयुत ऊर्जेचा पुरवठा नाही किंवा ज्या ठिकाणी नियमितपणे वीज पुरवठा होत नाही अशा ठिकाणी सौर आधारित ऊर्जेचा वापर करून विदयुत ऊर्जेची समस्या दूर करणे व आदिम जमातीचे गुडा / पाडा / गाव हे माँडल सोलर गाव निर्माण करणे या हेतूने सादर करणेत आलेली Model Solar Village Project For PVTG Habitations / Padas /Village /Remote Village ही योजना विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात 100% अनुदानावर रूफटॉप सोलर योजना सुरू - Model Solar Village Project For PVTG Habitations/Padas/Village/Remote Village

आदिवासी अति दुर्गम भागातील ज्या ठिकाणी विदयुत ऊर्जेचा पुरवठा नाही किंवा ज्या ठिकाणी नियमितपणे वीज पुरवठा होत नाही अशा ठिकाणी सौर आधारित ऊर्जेचा वापर करून विविध उपक्रम जसे कि पाणी पुरवठा योजना, गावातील शासकीय कार्यालये, पथ दिवे व इतर इत्यादी सौरउर्जेवर संचालित करणे तसेच विदयुत ऊर्जेची समस्या दूर करणे या उद्देशाने विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन 2016-17 मध्ये Model Solar Village Project For PVTG habitations / padas /village /remote village ही योजना केंद्र शासनाच्या संदर्भाधिन पत्र क्र. १ अन्वये मंजूर करण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता प्राप्त निधी संदर्भाधिन २ येथील शासननिर्णयान्वये आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना वितरित करण्यात येणार आहे. 

आता, विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत Modal Solar Village Project For PvTG habitations / padas /village /remote village आदिम जमातीचे गुडा / पाडा / वस्ती / गाव हे मॉडल सोलर गाव निर्माण करणे ही रु. 1500.00 लक्ष किंमतीची योजना राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. 

आदिम जमातीचे गुडा/ पाडा/ वस्ती/ गावाांमध्ये सौर आधारित ऊर्जेचा वापर करून विदयुत ऊर्जेची समस्या दुर करणे व अशा ठिकाणी सौर आधारित ऊर्जेचा वापर करून विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने  “Modal Solar Village Project For PvTG habitations / padas /village /remote village आदिम जमातीचे गुडा / पाडा / वस्ती / गाव हे मॉडल सोलर गाव निर्माण करणे” ही विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत रु. 1500.00 लक्ष किंमतीची मंजूर योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक १ नुसार मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे. 

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरित तरतुदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरित कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, यांनी करावी व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.


हेही वाचा - मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत 7.5 एचपी पंपाचे पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

1 Comments