गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखात आपण गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती पाहिली, आता आपण या लेखात गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना अकराचा सारांश:

(एक) पिकांखालील एकूण क्षेत्र-

(दोन) वजा (-) बिनआकारी किंवा गावठाण जमिनीतील किंवा बिनभोगवट्याच्या म्हणून वर्गिकृत केलेल्या परंतु तात्पुरती लागवड करण्यास परवानगी दिलेल्या जमिनीतील पिके- 

(तीन) अधिक (+) बिनभोगवट्याची परवानगी 

(चार) एकूण (गाव नमुना एकचा गोषवाराच्या अ (एफ) मध्ये दर्शविण्यात आलेल्या क्षेत्राइतके)

गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती
गाव नमुना ११
गाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना अकरा हा गाव नमुना बारा मधील माहितीमधून संकलित केलेला नमुना आहे. पिकपाहणी पूर्ण केल्यानंतर लगेचच तलाठी यांनी हा नमुना तयार करावा. गाव नमुना अकरातील एकूण क्षेत्र गाव नमुना एकच्या गोषवाऱ्याशी जुळले पाहिजे. गाव नमुना अकरा या नमुन्यात दिलेल्या 'पिकांचे वर्ग' या सदराखाली न येणारी पिके 'इतर' या सदराखाली नमूद करावीत. 

विशिष्ट् गावांमध्ये गाव नमुना अकराचे जितके स्तंभ आवश्यक असतील तितकेच स्तंभ तयार करावे. 

गाव नमुना अकरामध्ये पिकांच्या वर्गाचे एकूण ३२ स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे भरावेत. 

गाव नमुना अकरामध्ये - स्तंभ १ मध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक लिहावा. 

गाव नमुना अकरामध्ये - स्तंभ २ मधील वर्ग एकच्या धान्यात १. तायचुंग भात, २. अधिक उत्पादन असलेला इतर जातीचा तांदूळ, ३. तुसयुक्त तांदूळ, ४. साफ केलेला तांदूळ, ५. मॅक्सीकन गहू, ६. अधिक उत्पादन असलेला इतर जातीचा गहू, ७.ज्वारी, ८. संकरित ज्वारी, ९. बाजरी, १०. संकरित बाजरी, ११. बार्ली, १२. मका, १३. संकरित मका, १४. हरित किंवा कोद्रा, १५. नाचणी , १६. राग १७. कुटकी, १८. वरई, १९. सावा, २०. बंटी, २१. भादळी या तृणधान्य पिकांची नोंद घ्यावी.

गाव नमुना अकरामध्ये - स्तंभ ३ मधील वर्ग दोन मध्ये २२. चणा, २३. मूग, २४. तूर, २५. काळा हरभरा (चणे), २६. कुळीथ, २७. मसूर, २८. घेवडा (बीन ), २९. वाल किंवा पावटा, ३०. चवळी, ३१. वाटाणा, ३२. लाख या डाळींची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग तीनच्या पिकांसाठी, फळबाग व बागायती उत्पादने या वर्गवारीसाठी स्तंभ ४,५,६,आणि ७ दिलेले आहेत. यातील स्तंभ ४ च्या ( अ ) उपस्तंभाखाली ३३. बटाटा, ३४. रताळे, ३५. याम, ३६. सुरण (एलिफन्ट फुट), ३७. गाजर, ३८. नवलकोल, ३९. मुळा, ४०. फुल कोबी, ४१.कांदे , ४२.पत्ता कोबी, ४३. वांगे, ४४. टोमॅटो या फळभाज्यांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग तीनच्या पिकांसाठीच्या स्तंभ ५ च्या ( ब ) उपस्तंभाखाली ४५. मेथी, ४६. भेंडी, ४७. कस्तुरी खरबूज, ४८. कलिगड, ४९. बिट या पालेभाज्यांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग तीनच्या पिकांसाठीच्या स्तंभ ६ च्या ( क ) उपस्तंभाखाली ५०. विलायती गवत, ५१.उष्ण हवेतील ज्वारी, ५२. गिनी गवत, ५३. ओट, ५४. फिल्ड व्हेच आ गुरांसाठी चारा या प्रकारातील पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग तीनच्या पिकांसाठीच्या स्तंभ ७ च्या ( ड ) उपस्तंभाखाली ५५. केळी ५६. आंबा, ५७. लिंबू, ५८. संत्रे, ५९. मोसंबी, ६०.पामेलो किंवा शाडॉक, ६१. डाळिंब, ६२. सफरचंद, ६३.पेरू, ६४. सीताफळ, ६५. अननस, ६६. अंजीर, ६७. फणस, ६८. चिकू, ६९. पपई, ७०. काजू, ७१. रामफळ, ७२. दाक्षे, ७३. जर्दाळू या फळझाडांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग चार- स्तंभ ८ मध्ये औषधी व गुंगीकारक द्रव्ये यामध्ये ७४. तंबाखू , ७५. कॉफी, ७६. चहा, ७७. भारतीय भांग, ७८. विड्याची पाने, ७९. ओवा, ८०. अफू, ८१. कोयनेल, ८२. या प्रकारच्या इतर पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग पाच - स्तंभ ९ मध्ये ८३. सुपारी, ८४.वेलदोडा, ८५. मिरच्या, ८६. आले, ८७. काळी मिरी ८८. हळद, ८९. बडीशेप किंवा त्याचे बी, ९०. धणे, ९१. जिरे, ९२. मेथी, ९३. लसूण, ९४. चिंच या प्रकारच्या मसाल्याचे पदार्थ पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - स्तंभ १० वर्ग सहा मध्ये पिष्ठे पिकांची नोंद घ्यावी.  या प्रकारच्या मसाल्याचे पदार्थ पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग सात -स्तंभ ११ मध्ये  ९५. ऊस, ९६. खजूर, ९७. इतर साखरेचे उत्पादन करणाऱ्या पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग आठ -स्तंभ १२ मध्ये ९८. तीळ किंवा जिंजेली बिया, ९९. जवस, १००. एरंडी १०१. पांढरी मोहरी , १०२. साधी मोहरी, १०३. काराळे , १०४. भुईमूग, १०५. बडीशेप बी, १०६. नारळ, १०७. करडई , १०८. कुसूंब या प्रकारच्या तेलबिया / गळीत धान्याची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग नऊ -स्तंभ १३ मध्ये १०९. नीळ, ११०. इतर अशा रंग द्रव्ये व चर्मशोधन द्रव्यांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग दहा -स्तंभ १४ मध्ये १११. कापूस, ११२. ताग, ११३. मुंबईची भांग, ११४. भांग, ११५. चायना ग्रास रिहा, ११६. काथ्या या तंतू पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ १५ आणि वर्ग अकरा( अ ) - स्तंभ १६ मध्ये ११७. बाभूळ, ११८. करडई, ११९. कारले, १२०.पील, १२१. हुंडी, १२२. इतर प्रकारच्या संकीर्ण आणि गवत प्रकारच्या पिकांची नोंद घ्यावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ १७ मध्ये इतर पिके असल्यास त्या पिकाचे नाव नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ १८ मध्ये वरील इतर पिकांखालील क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ १९ मध्ये पेरलेले एकूण क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २० मध्ये  एकूण पेरलेल्या क्षेत्रातून एकापेक्षा अधिक वेळा पेरलेले क्षेत्र वजा (-) करुन तो आकडा लिहावा. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २१ मध्ये पेरलेले बाकी निव्वळ क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २२ मध्ये फेर पाळीच्या खऱ्या पडीक जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २३ मध्ये लागवडयोग्य पडीत म्हणजे एक वर्षापेक्षा अधिक व पाच वर्षापर्यत पडीत असलेल्या जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २४ मध्ये लागवड अयोग्य पडीत म्हणजे पाच वर्षापेक्षा अधिक काळ परंतु पोटखराबा नसलेल्या जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २५ मध्ये शिंदाड किंवा राबाच्या जमिनीचे क्षेत्र नमूद करावे.

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २६ मध्ये गरीब परिस्थितीमुळे किंवा भांडणामुळे न पेरलेल्या जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २७ मध्ये प्रतिकूल पावसामुळे न पेरलेल्या जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २८ मध्ये न पेरलेल्या जमिनींबाबतची इतर करणे नमूद करावी. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ २९ मध्ये  इतर कारणांमुळे न पेरलेल्या जमिनींबाबतचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ ३० मध्ये एकूण पडीक जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ ३१ मध्ये भोगवट्या खालील एकूण पडीक जमिनीचे क्षेत्र नमूद करावे. 

गाव नमुना अकरा - वर्ग अकरा -स्तंभ ३२ हा शेरा स्तंभ आहे. 

 तक्त्याखाली गाव नमुना अकराचा सारांश खालीलप्रमाणे नमूद करावा. 

( एक ) पिकांखालील एकूण क्षेत्र - हे. आर मध्ये. 

( दोन ) पिकांखालील एकूण क्षेत्रातून बिनआकारी किंवा गावठाण जमिनीतील किंवा बिनभोगवट्याच्या म्हणून वर्गीकृत केलेल्या परंतु तात्पुरती लागवड करण्यास परवानगी दिलेल्या जमिनींखालील पिकांचे क्षेत्र ( - ) करावे. 

( तीन ) वरील क्षेत्रामध्ये बिनभोगवट्याची आकारी जमिनीचे क्षेत्र मिळवावे. 

( चार ) एकूण क्षेत्र = गाव नमुना एकचा गोषवाराच्या अ ( एक ) मध्ये दर्शविण्यात आलेल्या क्षेत्राइतके असेल. 

या तक्त्याखालील जलसिंचनाचा गोषवारा लिहावा. 

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments