गाव नमुना १४ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १४ ही गावात असणाऱ्या आणि माणसांना तसेच प्राण्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या साधनांची आणि शेतीसाठी करण्यात येणाऱ्या जलसिंचन संबंधित आकडेवारीची नोंदवही आहे. ही नोंदवही सतत चालू रहाणारी आहे, यात दरवर्षी वाढ, दुरुस्ती, घट यांच्या नोंदी घेऊन हि नोंदवही साधारणतः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अद्ययावत करावी आणि अद्ययावत गाव नमुना चौदाचा गोषवारा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तहसिलदारांना सादर करावयाचा आहे. 

गाव नमुना १४ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १४ विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना चौदा मध्ये ७ स्तंभ आहेत ते खालीलप्रमाणे भरावे.
 
गाव नमुना चौदा - स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे. 
गाव नमुना चौदा - स्तंभ २ मध्ये पाणीपुरवठ्याच्या साधनांचा प्रकार ( विहीर, नदी ) नोंदवावा. 
गाव नमुना चौदा - स्तंभ ३ मध्ये पाणीपुरवठ्याच्या साधनाचे ठिकाण ( पत्ता ) लिहावे. 
गाव नमुना चौदा - स्तंभ ४ मध्ये सदर पाणीपुरवठ्याचे साधन पक्के आहे किंवा कच्चे आहे ते लिहावे. 
गाव नमुना चौदा - स्तंभ ५ मध्ये सदर पाणीपुरवठ्याच्या साधनांचा वापर कोणत्या प्रयोजनासाठी (गुरे धुणे ,जलसिंचनासाठी किंवा पिण्यासाठी अथवा इतर कारणांसाठी ) होतो ते लिहावे. 
गाव नमुना चौदा - स्तंभ ६ मध्ये सदर पाणीपुरवठ्याच्या साधनांची मालकी कोणाची आहे ( शासकीय / स्थानिक संस्थेची / खाजगी ते लिहावे. 
गाव नमुना चौदा - स्तंभ ७ हा शेरा स्तंभ आहे.

गाव नमुना १४ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १४ चा गोषवारा:
 
गाव नमुना १४ चा गोषवारा मध्ये १६ स्तंभ आहेत. ते खालीलप्रमाणे भरावे. 

गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १ हा अनुक्रमांकाचा आहे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ २ मध्ये पाणीपुरवठ्याच्या साधनांचा प्रकार ( सरकारी कालवे, खाजगी कालवे, तलाव व बंधारे, विहिरी, बुडकी इत्यादी, इतर साधने , ढेकुडी ( तेल , वाफ किंवा पवन शक्तीवर चालणारे पंप ) लिहावा. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ३ मध्ये जलसिंचनासाठी उपलब्ध असलेले, पक्के, प्रत्यक्ष वापरात असलेले साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ४ मध्ये जलसिंचनासाठी उपलब्ध असलेले चालू स्थितीत असलेले, पक्के परंतु वापरात नसलेले साधन लिहावे.  
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ५ मध्ये जलसिंचनासाठी टाकलेले ( बंद केलेले ) पक्के साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ६ मध्ये जलसिंचनासाठी उपलब्ध असलेले, कच्चे , प्रत्यक्ष वापरात  असलेले साधन लिहावे.  
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ७ मध्ये जलसिंचनासाठी उपलब्ध असलेले चालू स्थितीत असलेले, कच्चे परंतु वापरात नसलेले साधन लिहावे.
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ८ मध्ये जलसिंचनासाठी टाकलेले  ( बंद केलेले ) कच्चे साधन लिहावे.  
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ९ मध्ये माणसांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी परंतु जलसिंचनासाठी नाही असे पक्के साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १० मध्ये माणसांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी परंतु जलसिंचनासाठी नाही असे कच्चे साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ ११ मध्ये गुरे धुणे व इतर कारणांसाठी परंतु जलसिंचनासाठी किंवा किंवा पिण्यासाठी नाही असे पक्के साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १२ मध्ये गुरे धुणे व इतर कारणांसाठी परंतु जलसिंचनासाठी किंवा किंवा पिण्यासाठी नाही असे कच्चे साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १३ मध्ये नादुरुस्त झाल्यामुळे वापरात नसलेले ( स्तंभ ४, ७, व ८ मध्ये नोंदवलेल्या खेरीज इतर ) पक्के साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १४ मध्ये नादुरुस्त झाल्यामुळे वापरात नसलेले ( स्तंभ ४, ७, व ८ मध्ये नोंदवलेल्या खेरीज इतर ) कच्चे साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १५ मध्ये इतर कारणांमुळे वापरात नसलेले ( स्तंभ ४, ७, व ८ मध्ये नोंदवलेल्या खेरीज इतर ) पक्के साधन लिहावे. 
गाव नमुना चौदाचा गोषवारा - स्तंभ १६ मध्ये इतर कारणांमुळे वापरात नसलेले ( स्तंभ ४, ७, व ८ मध्ये नोंदवलेल्या खेरीज इतर ) कच्चे साधन लिहावे. 

गाव नमुना १४ चा गोषवारा

Post a Comment

0 Comments