गाव नमुना २० विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना वीस हा तलाठी / मंडलअधिकारी यांच्यासाठी पोस्टाच्या तिकिटांची नोंदवही आहे.  सद्याच्या संगणक युगात बहूतांश संदेश इलेक्ट्रानिक उपकरणांमार्फत पाठवले जात असले तरी शासकीय कार्यपद्धतीत टपालाचे महत्व संपलेले नाही. सर्वच शासकीय कार्यपद्धतीत पोस्टाच्या तिकिटांची कायम कमतरता राहिली आहे. तरीही गाव नमुना वीसची नोंदवही तलाठी / मंडलअधिकारी यांनी कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. 

गाव नमुना २० विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना २० विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना वीस मध्ये एकूण ९ स्तंभ असून या नमुन्यात गोषवाराही आहे. ते खालील प्रमाणे भरावेत.

गाव नमुना वीस - दोन भागात विभागाला जातो. ( अ ) ताब्यातील तिकिटे ( ब ) वापरात आणलेली तिकिटे ताब्यातील तिकिटे या भागात स्तंभ १ ते ४ येतात, त्यातील स्तंभ १ मध्ये दिनांकाची नोंद करावयाची आहे. 

गाव नमुना वीस, ताब्यातील तिकिटे - स्तंभ २ मध्ये तिकिटांची संख्या लिहावी. 

गाव नमुना वीस, ताब्यातील तिकिटे - स्तंभ ३ मध्ये तिकिटांची परिमाण नमूद करावे. 

गाव नमुना वीस, ताब्यातील तिकिटे - स्तंभ ४ मध्ये तिकिटांचे मूल्य नमूद करावे. 

गाव नमुना वीस, वापरात आणलेली तिकिटे, या भागात स्तंभ ५ ते ९ येतात, यातील - स्तंभ ५ मध्ये जर तिकिटाचा वापर केला असेल तर तो ज्या दिनांकास केला तो दिनांक नमूद करावा. 

गाव नमुना वीस, वापरात आणलेली तिकिटे- स्तंभ ६ मध्ये तिकीट कोणाला पत्र पाठवण्यासाठी वापरले त्याचे नाव नमूद करावे. 

गाव नमुना वीस, वापरात आणलेली तिकिटे- स्तंभ ७ मध्ये तिकीट वापरल्यानंतर शिल्लक तिकिटांची संख्या लिहावी. 

गाव नमुना वीस, वापरात आणलेली तिकिटे- स्तंभ ८ मध्ये तिकीट वापरल्यानंतर शिल्लक परिमाण नमूद करावे. 

गाव नमुना वीस, वापरात आणलेली तिकिटे- स्तंभ ९ मध्ये, तिकीट वापरल्यानंतर शिल्लक तिकिटांचे मूल्य नमूद करावे. 

गाव नमुना २०

गाव नमुना वीसच्या खाली पोस्टाच्या शासकीय तिकिटांच्या नोंदवहीचा गोषवारा दर सोमवारी काढायचा आहे. यातील स्तंभ ( १ ) मध्ये शिल्लक परिमाण, स्तंभ ( २ ) मध्ये शिल्लक तिकिटांची संख्या तर स्तंभ ( ३ ) मध्ये शिल्लक तिकिटांचे मूल्य नमूद करावे.

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments