एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नविन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे, सामुहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेड्नेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अज्ञद्रव्ये व एकात्मिक कोड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीतोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. सन २०१४-१५ पासुन केंद्रशासनाने सदरचे कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत (M|DH) राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान:

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची उद्दिष्टे:

 1. भिन्न कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणींतौर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूहू पद्धतीने सर्वांगीन विंकास करणे.
 2. शेतक-याना एकत्रित करून शेतक-यांचे गट निर्माण करणे व शेतकरी उत्पादक समूहू स्थापीत करणेसाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे.
 3. शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहराविषयी पोषणमुल्य वाद्घवेिणं..
 4. आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
 5. पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे.
 6. कुशल आणि अकुशल विषेशतः बेरोजगार तरूणांकरिता रॉजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची वैशिष्ट्ये:

 1. उत्पादक तें अंतिम उपभोक्तापर्यंत फलोत्पादनाच्या विनियोगासाठी उत्पादक, काढ्णींतॉर हाताळणी, प्रक्रिया व पणन व्यवस्था तसेच उपभोक्ता यामध्ये साखळी निर्माण करून उत्पादकांना अधिकाधिक मोबदला मिळेल याची खात्री करणे.
 2. उत्पादन, काढणीतोर हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विंकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या वापरासाठी प्रोत्साहून देणे.
 3. पेंक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह, नियंत्रित वातावरणातील साठवणूकगृह या सारख्या काढणीतर सुविधा तसेच मुल्यवृधींसाठी प्रक्रिया सुविधा आणि पणन अशा प्रकारच्या सुविधा स्थापन करण्यासाठी
 4. अर्थसहाय्य करणे.
 5. संशोधन आणि विकास प्रक्रिया आणि पणन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थामध्ये राष्ट्रीयप्रादेशिक-राज्य तसेच स्थानेिक स्तरावर समन्वय व एकात्मेिकता आणि एकरूपता आणून भागीदारीस प्रोत्साहून देऊन विकास साधणे.
 6. सर्व स्तरावर क्षमता, विकास व मनुष्यबळ विकासासाठी राबविण्यात येणा-या कार्यक्रमांना प्रोत्साहून देणे.

शेतक-यांच्या सोयींसाठी मराठीमध्ये संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. https://hortnet.gov.in/ या संकेतस्थळावर शेतकरी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या योजनेसाठी अर्ज करू शकतात, यामुळे वेळेची व पैशाचीं बचत होतें.

हॉर्टनेट्दारे अनुदान वितरण थेट लाभार्थीच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा केले जाते. तसेच हॉर्टनेट अंमलबजावणीसाठी बेस्ट आयर्टी अंमलबजावणींबाबतचा पुरस्कार सुध्दा मंडळास प्राप्त झाला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचे विविध घटक आणि अनुदान:

या अभियाना अंतर्गत शेतकरी/उद्योजक यांना विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते. 

 1. शेडनेट हाऊस, हरितगृह, पिक संरक्षण उपकरणे, रोपवाटिका स्थापन करणे, ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थपना/बळकटीकराण,  पैक हाऊस, शीत वाहन, पिक चिकित्सालयाची स्थापना, जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळा.
 2. द्राक्षे केळी पपई स्ट्रॉबेरी लागवड, अळींबी उत्पादन, फुलांची लागवड, मसाला पिके सुगंधी वनस्पती लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन.
 3. सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरिकरण, प्लास्टीक मल्चींग. 
 4. पक्षिरोधक जाळी, ऊती/पाने यामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी साठी प्रयोगशाळा.
 5. गांडूळ खत उत्पादन केंद्र, सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब, मधुमक्षिका पालन.
 6. ट्रॅक्टर पॉवर टीलर, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कॉल्ड स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, कांदा चाळ, वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार, संकलन व प्रतवारी केंद्र इ.

वरील घटकांसाठी 25 टक्के ते 55 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

अधिक माहितीकरिता मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत "अळिंबी (मशरूम) उत्पादन प्रकल्प योजना"

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments