महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला

शेतकरी कर्जमाफीचा आज दिनांक १८ मार्च २०२१ रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. आता पर्यंत ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी रुपयाची मदत शेतकरी कर्जमाफीसाठी देण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजने मध्ये ३५ लाख शेतकऱ्यांची खाती हि पात्र झाली होती मात्र, कर्जमाफीची सातवी यादी जाहीर झाल्यानंतर निधी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांची बँक कर्ज खाती निरंक झालेली नाहीत, आणि अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा सातव्या यादीत त्यांची नावे आलेली नाहीत, अशाच विविध शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय आज घेण्यात आला आहे. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शासन निर्णय: 

दि .१.४.२०१५ ते दि . ३१.३.२०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी " महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019” हि कर्जमुक्ती योजना संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना तातडीने देणार आहेत. सदर प्रयोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये रु. १,०५० कोटी, संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये रु. २,३३४ कोटी, संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये रु. १,३०६ कोटी, संदर्भ क्र. ६ च्या शासन निर्णयान्वये रु. ३७८. २६ कोटी, संदर्भ क्र. ७ च्या शासन निर्णयान्वये रु. ५८५. ३२ कोटी व संदर्भ क्र. ८ च्या शासन निर्णयान्वये रु. २६८.६८ कोटी, संदर्भ क्र. ९ च्या शासन निर्णयान्वये रु. ७४१.५० कोटी व संदर्भ क्र. १० च्या शासन निर्णयान्वये रु. ९००.०० कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी आणखी काही निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. 

" महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ - ( २४३५   ०१४२ ) " या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ साठी वितरित निधी वगळता रु. १८०.०० कोटी ( रुपये एकशे ऐंशी कोटी ) इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 

सदर तरतूद खर्च करण्यासाठी ( VOOO४ ) सरकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक ( अंदाज व नियोजन ), सहकार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल हे सरकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे हे पाहणार आहेत. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवण्यात येणार आहे. 

सदरहू रक्कम मागणी क्र. व्ही - ०२, मुख्य लेखाशिर्ष " २४३५ - इतर कृषीविषयक कार्यक्रम, ६० - इतर, १०१ - शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी योजना, (००) ( ०३ )  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ ( राज्य स्तर ) ( कार्यक्रम ), ( २४३५   ०१४२ ) - ३३ अर्थसहाय्य " या लेखाशिर्षाखालील सन २०२० - २१ या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून खर्च करण्यात येणार आहे. 

सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३०/ १४३१, दि. २८. १. २०२१ वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १४६/ २०२१/व्यय - २, दि. १७. ३. २०२१ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. 

शासन निर्णय:- सन 2020-21 मधील अर्थसंकल्पित तरतुदींचे वितरण करणेबाबत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्य स्तर) (कार्यक्रम), (2435 0142) - शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा - महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना - कर्जमाफीची सातवी यादी जाहीर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !! 

Post a Comment

1 Comments

  1. 2 लाखावरील कर्ज माफी चा काही निर्णय झाला आहे का?

    ReplyDelete