कृषी यांत्रिकीकरण योजना - ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी वाढीव निधी मंजूर पहा नवीन शासन निर्णय

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतंर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक -3, वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे/यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्र-4, कृषी औजारे/यंत्र बँकाना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी करावयाची आहे. सदर घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करावयाची आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना - ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी वाढीव निधी मंजूर पहा नवीन शासन निर्णय

या योजनेसाठी सन 2020-21 या वर्षात मूळ तरतूद रु.7600 लक्ष एवढी होती. सुधारीत अंदाजामध्ये रु. 3800 लक्ष तरतूद मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी वित्त विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार मूळ तरतूदीच्या 25% म्हणजे रु.1900 लक्ष एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार संदर्भाधीन दि. 5 फेब्रुवारी, 2021 च्या शासन निर्णयान्वये रु.1900 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन सदर निधी आयुक्त (कृषी) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे.

वित्त विभागाने सुधारीत तरतूदीपैकी उर्वरित रु.1900 लक्ष निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार यापूर्वी दिलेल्या रु.1900 लक्षच्या प्रशासकीय मान्यतेएवजी रु.3800 लक्ष रकमेच्या कार्यक्रमास सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन रु.1900 लक्ष निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना:

1) सन 2020-21 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, संदर्भाधीन दि. 5 फेब्रुवारी, 2021 च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या रू.1900 लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमाच्याऐवजी रू.3800 लक्ष (अक्षरी रुपये अडतीस कोटी फक्त) रकमेच्या कार्यक्रमास या शासन निर्णयान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहेत.  

2) या शासन निर्णयान्वये, सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता रु.1900 लक्ष (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषी ) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS)वितरित करण्यात येणार आहे.

3) सदर योजनेअंतर्गत मंजूर केलेला रु.1900 लक्ष निधी (अक्षरी रुपये एकोणीस कोटी फक्त) खालील लेखाशिर्षाखालील चालू वर्षी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून खर्ची टाकण्यात येणार आहे.

4) या योजनेंअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी केद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातंर्गत अनुज्ञेय बाबींवर खर्ची टाकावा, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

5) अनुदानाची रक्कमेचे वितरण पीएफएमएस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

6) सदर योजनेंअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रु.1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा रु.1 लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

7) इतर बाबतीत योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्र.1 येथील शासन निर्णयामधील अटी व  शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

8) सदर निधी खर्च करताना तो विहित कार्यपद्धती अनुसरुन सर्व वित्तीय कायदे/प्रक्रियाचे /वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत /C.V.C.तत्वानुसार /प्रचलित शासन निर्णय / नियम / परिपत्रक /तरतदुीनुसार बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणांनी करावी. कोणत्याही परिस्थितीत कुठलाही नियम / अधिकाराचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची राहणार आहे. 

9) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (नि. व गु. नि.),कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन, उद्दिष्टनिहाय अमबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्गमित कराव्यात. सदर योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला शेतकरी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक / आर्थिक लक्षांक निर्धारित करण्यात येणार आहेत. 

10) सन 2020-21 मध्ये राज्यात सदर योजनेंअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या निधीच्या आहरण व संवितरणासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण तसेच आहरण व  संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहेत.


कृषी यांत्रिकीकरण योजना - ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी वाढीव निधीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments