गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही), गाव नमुना १ चा गोषवारा आणि गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे, या लेखामध्ये गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती


गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही):

गाव नमुना एक-ब नमुना ही भोगवट्याच्या ( सरकारी ) जमिनीची नोंद असणारी एक दुय्यम नोंदवही आहे. ज्या गावात दहा किंवा दहापेक्षा अधिक बिन भोगवट्याच्या ( सरकारी ) जमिनीचे भूमापन क्रमांक आहेत त्या गावात ही नोंदवही ठेवण्यात येते. 

यातील स्तंभ ( १ ) मध्ये भूमापन क्रमांकाची नोंद घ्यावी. 

स्तंभ ( २-अ ) मध्ये क्षेत्राची नोंद हेक्टर - आर मध्ये घ्यावी. 

स्तंभ ( २-ब ) मध्ये आकारणीची नोंद रु. पै. मध्ये घ्यावी. 

स्तंभ ( ३ ) मध्ये बिन आकारी क्षेत्राची नोंद हेक्टर - आर मध्ये घ्यावी. 

स्तंभ ( ४ ) मध्ये सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकार उदा. निशुल्क गायरान, गुरांचा तळ, सरकारी वन, इत्यादींची नोंद घ्यावी. 

स्तंभ ( ५ ) हा शेरा स्तंभ आहे. 

गाव नमुना १-ब (बिन भोगवट्याच्या (सरकारी) जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

या नोंदवहीमुळे गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यातील अ - दोन या शिर्षकाखालील तपशिलाचे अचूक संकलन होण्यास मदत मिळते. या नोंदवहीमुळे विल्हेवाटीसाठी उपलब्ध जमिनीची माहिती असल्यामुळे याचा बराच उपयोग होतो.

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments